मुंबई: रिलायन्स जिओने मागील वर्षी आपल्या प्रीपेड प्लानमध्ये बदल केले आहेत. जिओने आपल्या प्लानच्या किंमतीत वाढ केलीच शिवाय जिओमधून अन्य नेटवर्कवरील अनलिमिटेड कॉलिंगही बंद केली. त्यानंतर अन्य नेटवर्कवर कॉल करण्यास ग्राहकांना नॉन मिनिट्सची आवश्यकता भासते. हे नॉन जिओ मिनिट्स संपल्यानंतर ग्राहकांना टॉप अप करावा लागतो. अशा ग्राहकांना जिओने खास ऑफर दिली आहे.

नॉन जिओ मिनिट्ससाठी ग्राहकांना १० रुपयांचा टॉप अप खर्च करावा लागतो. हा १० रुपयांचा टॉप केल्यानंतर ग्राहकांना एक जीबीचा डेटा मोफत देण्यात येत आहे.

मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये जिओने IUC चार्ज आकारण्या सुरुवात केली होती. त्यामुळे अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी ६ पैसे प्रति मिनिट आकारणी होऊ लागली होती. या निर्णयामुळे अनेक ग्राहक नाराज झाले होते. त्यानंतर ग्राहकांसाठी जिओने प्रीपेड प्लानसह नॉन जिओ मिनिट्स देण्यास सुरुवात केली. जवळपास सगळ्याच प्रीपेड प्लानमध्ये जिओकडून नॉन जिओ मिनिट्स देण्यात येतात.

जिओचा सगळ्यात स्वस्त टॉपअप प्लान १० रुपयांचा आहे. या १० रुपयांच्या रिचार्जमध्ये १२४ IUC मिनिट्स मिळतात. आता, जिओ दर १० रुपयांच्या टॉप अपमध्ये एक जीबी डेटा देत आहे. त्यामुळे अन्य नेटवर्कवर ग्राहक कॉल करण्यासाठी जितक्या वेळेस १० रुपयांचा टॉप अप करणार तितक्या वेळेस त्याला एक जीबी डेटा मोफत मिळणार आहे. जिओचे २०, ५०, १००, ५०० आणि एक हजार रुपयांचे टॉपअप वाउचर आहेत.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here