नवी दिल्लीः स्मार्टफोन मार्केट वेगाने वाढत आहे. एका पाठोपाठ एक डिव्हाईसेज इनोव्हेटिव फीचर्स सोबत लाँच होत आहेत. त्यामुळे टॉप पोझिशनवर जागा बनवण्यासाठी तसेच स्थान कायम राखण्यासाठी नवीन ब्रँड साठी सोप नसते. ओप्पोच्या सब ब्रँड पासून स्वतंत्र कंपनी बनलेल्या रियलमीने २०१८ नंतर मोठे मार्केट वर कब्जा मिळवला आहे. तसेच अनेक रिकॉर्ड्स बनवला आहे. आता रियलमी सर्वात वेगाने उदयास येत असलेला ब्रँड म्हणून समोर येत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास २० टक्के ग्रोथ फेस्टिव सीजनमध्ये कंपनीने नोंद केली आहे.

वाचाः

रियलमीने बुधवारी म्हटले की, फेस्टिव सीजनच्या ४५ दिवसांत कंपनीने जवळपास ८३ लाख डिव्हाइसेजची विक्री केली आहे. ज्यात ६३ लाख स्मार्टफोन्सचा समावेश आहे. या दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेत फेस्टिव सेल्समध्ये रियलमीने २० टक्के जबरदस्त परफॉर्म केला आहे. कंपनीने २०२० च्या तिसऱ्या तिमाहीत फास्टेस्ट ग्रोईंग स्मार्टफोन ब्रँड म्हणून ५ कोटी डिव्हाईसेजची विक्री केली आहे. हे दोन रेकॉर्ड बनले आहे. हा आकडा गेल्यावर्षीच्या तुलनेत ४५ टक्के जास्त आहे.

वाचाः

भारतात जवळपास अर्धे शिपमेंट
गेल्या तिमाहीच्या तुलनेत रियलमीने मार्केट परफॉर्मन्स १३२ टक्के राहिले आहे. मार्केट ट्रॅकिंग फर्म काउंटरपॉइंटकडून शेयर करण्यात आलेल्या डेटानुसार, २०२० च्या तिसऱ्या तिमाही (जुले ते सप्टेंबर) दरम्यान एकूण ग्लोबल शिपमेंट्सच्या अर्धे म्हणजेच जवळपास ३ कोटी डिव्हाइसेज कंपनीने भारतात विकले आहेत. याशिवाय, आयडीसीकडून रियलमीला भारतात व्हियरेबल सेगमेंटचे किंग म्हटले आहे.

वाचाः

व्हियरेबल वॉच कॅटेगरीत नंबर वन
ICD ने सांगितले की, जुलै ते सप्टेंबर च्या तिमाहित रियलमीने २२.१ टक्के मार्केट शेयर सोबत व्हियरेबल वॉच कॅटेगरीत नंबर वन स्थान पटकावले आहे. रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी सांगितले की, आम्ही इतक्या वेगाने रियलमी प्रोडक्ट्सचे अडॉप्टेशन पाहून आनंदी आहोत. रियलमी सर्व किंमतीच्या सेगमेंटमध्ये हाय फीचर्स, स्टाइल आणि परफॉर्मन्सचे ब्लॉकबस्टर प्रोडक्शन ऑफर करीत आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here