नवी दिल्लीः रिलायन्स जिओने पहिला ४ जी फीचर फोन लाँच करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. जिओ फोनला १५०० रुपयांच्या किंमतीत लाँच केले होते. परंतु, २०१९ मध्ये दिवाळी ऑफर अंतर्गत जिओ फोनला ६९९ रुपयांत विक्री केली जात होती. परंतु, आता या फोनच्या किंमतीत कंपनी ३०० रुपयांची वाढ करणार आहे.

वाचाः

वाचाः

टेलिकॉम टॉकच्या माहितीनुसार, जिओ फोनच्या ऑफलाइन रिटेलर्सने म्हटले की, जिओ लवकरच जिओ फोनच्या किंमतीत ३०० रुपयांची वाढ करणार आहे. या दरवाढीनंतर फोनची किंमत ९९९ रुपये होणार आहे. फोनच्या किंमती वाढीसोबत फोन सोबत १२५ रुपयांचा रिचार्ज सुद्धा बंधनकारक केला आहे. त्यामुळे या फोनची किंमत आता ११२४ रुपये झाली आहे. जिओ कडून अद्याप या संबंधीची कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.

वाचाः

वाचाः

जिओ फोनमध्ये २.४ इंचाचा डब्ल्यूव्हीजीए डिस्प्ले, १.२ गीगाहर्ट्जचे स्प्रिडट्रम एसपीआरडी ड्यूल कोर प्रोसेसर, ग्राफीक्ससाठी माली ४०० जीपीयू, ५१२ एमबी रॅम, ४ जीबी स्टोरेज, सिंगल सीम सपोर्ट, दिला आहे. फोनमध्ये २ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, ०.३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, २००० एमएएच क्षमतेची बॅटरी, ४ जीबी व्हीओएलटीई, ब्लूटूथ व्ही ४.१ , वाय फाय, एनएफसी, एफएम रेडियो, जीपीएस आणि यूएसबी २.० सपोर्ट दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here