नवी दिल्लीः प्रीपेड टेलिकॉम मार्केटमध्ये जिओ टॉपवर असला तरी पोस्टपेड प्लान्स सोबत सब्सक्रायबर्स एअरटेलवर विश्वास ठेवतात. जिओने सुद्धा पोस्टपेड मार्केटमध्ये आपले पाऊल ठेवले आहे. परंतु, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाचे पोस्टपेड प्लान एकमेकांना टक्कर देत आहेत. वोडाफोन आयडियाचे RedX पोस्टपेड प्लान सध्या सर्वात जास्त बेनिफिट देणारे पोस्टपेड प्लान्सपैकी एक आहेत. अनलिमिटेड डेटा बेनिफिटे सोबत येणारे एअरटेलचा प्लान सुद्धा अनेक अतिरिक्त बेनिफिट्स ऑफर करतो.

वाचाः

भारती एअरटेलचा १५९९ रुपयांचा प्लान
पोस्टपेड एअरटेल सब्सक्रायबर्सला ऑफर करीत असलेला १५९९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा कंपनीकडून दिला जातो. हे १५० जीबी प्रति महिना या प्रमाणे मिळतो. या प्लानमध्ये रोज १०० एसएमएस आणि भारतात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तसेच यात २०० आयएसडी मिनिट्स मिळतात. युजर्स इंटरनॅशनल रोमिंग प्रक्सवर १० टक्के डिस्काउंट मिळवू शकतात.

वाचाः

अतिरिक्त बेनिफिट्समध्ये या प्लानमध्ये ९९९ रुपयांची अॅमेझॉन प्राईम मेंबरशीप, ३९९ रुपयांची डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपी मेंबरशीप, Airtel Xstream Premium चे सब्सक्रिप्शन आणि एयरटेल हँडसेट प्रोटेक्शन मिळते. या प्लानसोबत एअरटेल फ्री रेग्यूलर अॅड ऑन कनेक्शन दिले जाते. याचाच अर्थ १५९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान दोन सिम कार्ड्सवर काम करतो.

वाचाः

वोडाफोन आयडियाचा १०९९ रुपयांचा RedX प्लान
RedX प्लान ची किंमत १०९९ रुपये आहे. या प्लानमध्ये १५० जीबी डेटा प्रति महिना लिमिट सोबत अनलिमिटेड डेटा बेनिफिट मिळतो. देशात सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग सोबत प्लान मध्ये रोज १०० एसएमएस ऑफर केले जाते. वोडाफोन आयडियाच्या या पोस्टपेड प्लानसोबत २९९९ रुपये किंमतीचे इंटरनॅशनल रोमिंग पॅकचे बेनिफिट सात दिवसांसाठी मिळते.

वाचाः

प्लानमध्ये प्रसिद्ध व्हिडिओ स्ट्रिमिंग सर्विसेज नेटफ्लिक्स, ZEE5 आणि अॅमेझॉन प्राइम चे सब्सक्रिप्शन एक वर्षासाठी मिळते. तसेच डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट्स लाउंजचे फ्री अॅक्सेस (वर्षात चार वेळा, एकदा इंटरनॅशनल) सुद्धा मिळते. तसेच याशिवाय, यूएसए आणि कॅनडा वरून आयएसडी कॉल्स ५० पैसे प्रति मिनिट, यूकेवरून ३ रुपये प्रति मिनिट आणि १४ देशातून स्पेशल रेट्सवर केले जावू शकते. तसेच१०९९ रुपयांच्या या रेडएक्स प्लान सोबत प्रीमियम कस्टमर सर्विस सुद्धा कंपनी ऑफर करीत आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here