वाचाः
गुगल मेसेज मध्ये एंड टू एंड एन्क्रिप्शन आल्यानंतर गुगल सुद्धा युजर्सचे मेसेज वाचू शकत नाही. गुगलचे प्रोडक्ट लीडने या फीचर संबंधी सांगितले की, गुगल प्रोडक्ट लीडच्या माहितीनुसार, एंड टू एंड एन्क्रिप्शन मधून हे निश्चित होणार आहे की, गुगल सह कोणताही तिसरा पर्सन तुमचा आणि तुमच्या अन्य व्यक्ती दरम्यान झालेले संभाषण कोणीही ऐकू शकणार नाही. किंवा मेसेज वाचू शकणार नाही.
वाचाः
विशेष म्हणजे गुगल गेल्या काही वेळे पासून एसएमएस ला रिच कम्यूनिकेशन सर्विस म्हणजेच RCS मध्ये अपग्रेड करीत आहे. या अंतर्गत इमेज आणि व्हिडिओज पाठवणे सोपे होणार आहे. WhatsApp आणि Telegram सारख्या इस्टेंट मेसेजिंग अॅपमध्ये एंड टू एंड एन्स्क्रिप्शन दिले आहे. अशातच अनेकदा सरकारकडे ही मागणी करण्यात आली आहे की, या एन्क्रिप्शनमुळे बॅड अॅक्टर्सला ट्रॅक करणे अडचणीचे ठरते आहे. परंतु, हे फीचर एका युजरसाठी फायदेशीर ठरते.
वाचाः
प्रायव्हेसी पसंत असलेल्या लोकांनी हे सर्व कम्यूनिकेशन प्लॅटफॉर्मवर देण्याची मागणी केली आहे. सध्या हे बीटा फेजमध्ये आहे. याला लवकरच सर्व अँड्रॉयड युजर्ससाठी अपडेट केले जाणार आहे. गुगल मेसेज अॅपला गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करता येवू शकते. अनेक अँड्रॉयड स्मार्टफोनमध्ये हे आधीच इन्स्टॉल असते.तर काहींना स्वतः इन्स्टॉल करावे लागते.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times