तुम्ही जर सातत्याने वापरत असाल तर सावधान! कारण आता तुमच्या अपरोक्ष नको असलेल्या फ्रेंड रिक्वेस्टही थेट स्वीकारल्या जात असल्याचा धोका निर्माण झाला आहे. फेसबुकच्या प्रणालीमुळेच या घटना घडत असून, युझर्सनी फेसबुकचा वापर करताना काळजी घेण्याचे आवाहन सायबरतज्ज्ञांनी केले आहे.
वाचाः
काही दिवसांपासून फेसबुक युझर्सना वेगवेगळ्या प्रकारची नोटिफिकेशन्स येतात त्यामध्ये ” असा संदेश लिहिलेला असतो. अनेकदा या यादीतील युझर्स अचानक मित्रांच्या यादीत समाविष्ट झालेले दिसतात. संबंधित युझर्सच्या परवानगीशिवाय हे नवे मित्र मित्रयादीत समाविष्ट झाल्याने आश्चर्याचा धक्का बसतो. अलीकडे या घटना वारंवार घडत असल्याने सावधगिरी बाळगण्याचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. स्मार्ट फोन वापरकर्ते बऱ्याचदा गेम किंवा इतर अॅपना लॉग इन करण्यासाठी फेसबुकचा वापर करतात. त्यामुळेही अशा घटना घडत असल्याचे सायबर तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. अॅपसाठी वापरल्या जाणाऱ्या फेसबुक लॉग इनवर फेसबुक कंपनीचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे याआधीच कंपनीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे युझर्सना विश्वासात न घेता काही व्यक्ती थेट मित्रयादीत समाविष्ट होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अॅपमध्ये लॉग इन करताना फेसबुकऐवजी मोबाइल क्रमांक किंवा ई-मेल आयडीचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
वाचाः
सावधगिरी बाळगण्याचा इशारा
फेसबुक अकाउंट सुरू करताना युझर्सना मोबाइलमधील कॅमेरा, काँटॅक्ट, फोटो, माइक अशा अनेक गोष्टींसाठी परवानगी द्यावी लागते. फेसबुकद्वारे केलेल्या चॅटचा डेटाही त्यांच्याकडे असतो. वैयक्तिक माहितीचा सगळा डेटा फेसबुककडे असताना आता त्यात ‘फ्रेंड रिक्वेस्ट मालवेअर’ची भर पडल्याने सावध राहण्याचा इशारा सायबरतज्ज्ञ देत आहेत.
वाचाः
फेसबुक वापरताना फ्रेंड रिक्वेस्ट मालवेअर समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. युझर्सना येणाऱ्या नोटिफिकेशन्सवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. कोणतेही अॅप वापरताना फेसबुकद्वारे लॉग इन करणे धोकादायक ठरू शकते. हा धोका ओळखून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
– रोहन न्यायाधीश, सायबर तज्ञ
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times