नवी दिल्लीः कॅलिफोर्नियाचे प्रीमियम टेक ब्रँड अॅपलकडून लाँच करण्यात आलेला आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल मार्केटमध्ये आला आहे. या आयफोनची डिलिव्हरी सुरू करण्यात आली आहे. सर्वात महाग असूनही या फोनची मागणी वाढली आहे. आयफोन खरेदी करण्याचं अनेकाचं स्वप्नं असतं परंतु, महाग असल्यानं ते पूर्ण होत नाही. परंतु, आयफोनची डिलिवरी करण्यासाठी जात असलेल्या एका डिलिवरी बॉयने आयफोनची डिलिवरी न करता रस्त्यांतून आयफोन घेवून पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे.

वाचाः

चीनच्या एका शिपमेंट कंपनीत काम करणाऱ्या तांगला अॅपलच्या ऑथोराइज्ड स्टोरवरून १४ iPhone 12 Pro Max यूनिट दुसऱ्या अॅपल स्टोरपर्यंत पोहोचायचे होते. तांग मात्र आयफोन तेथे न पोहोचवताच ते घेवून पळाला. त्यानंतर ऑर्डर रद्द केली. ऑर्डर १४ नोव्हेंबर रोजी प्लेस केली होती. तांगने याला गुइयांग अॅपल स्टोरेवरून कलेक्ट केले होते. ऑर्डर दुसऱ्या स्टोरपर्यंत जाताना सर्व फोन घेवून पळ काढला.

वाचाः

कमी किंमतीत ३ फोनची विक्री
ज्यावेळी आयफोनच्या कर्मचाऱ्यांना याचा सुगावा लागला. त्यावेळी त्याला पकडले. त्याच्याकडे १० आयफोन बॉक्समध्ये मिळाले. बाकीचे चार त्याने ओपन केले होते. एक स्वतः साठी आयफोन ठेवला. तसेच तीन आयफोन कमी किंमतीत रस्त्यात विकून टाकले होते. परंतु, नंतर पोलिसांनी ते सर्व आयफोन हस्तगत केले.

वाचाः

हे ध्यानात ठेवा
कधीही डिलिवरी बॉयकडून ऑर्डर कॅन्सल झाल्याची माहिती मिळाल्यास आपल्या अकाउंटवर जावून ऑर्डरचे स्टेट्स जरूर पाहा. जर डिलिवरी बॉयने आणलेल्या पॅकेजिंग व्यवस्थित दिसली नाही तर त्याला रिसिव करू नका. तसेच महागड्या प्रोडक्टची ओपन बॉक्स डिलिवरी मागणी सुद्धा तुम्ही करू शकता. महाग प्रोडक्ट्सची अनबॉक्सिंग डिलिवरी बॉयसमोर करून त्याचा व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड करू शकता.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here