नवी दिल्लीः Oppo ने जवळपास एक महिन्याआधी आपला बजेट स्मार्टफोन देशात लाँच केला होता. आता कंपनीने ओप्पो ए ३३ च्या किंमतीत कपात केली आहे. फ्लिपकार्टवर बनवलेल्या पेजवरून या फोनच्या किंमतीत १ हजार रुपयांची कपात करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. जर तुम्हाला ओप्पोचा हँडसेट खरेदी करायचा असेल तर ही तुमच्यासाठी खास संधी आहे. या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.

वाचाः

Oppo A33 ची किंमत
ओप्पोच्या या फोनची किंमत ११ हजार ९९० रुपये आहे. या फोनला या किंमतीत लाँच केले होते. परंतु, आता एक हजार रुपयांच्या कपातीनंतर या फोनची किंमत १० हजार ९९० रुपये झाली आहे. फ्लिपकार्ट लिस्टिंगमध्ये फोनची लेटेस्ट किंमतीसोबत अपडेट केले आहे. परंतु, कंपनीने अद्याप अधिकृत किंमत कपात केल्याची घोषणा केली नाही. ओप्पोचा हा फओन मूनलाइट ब्लॅक आणि मिंट क्रीम कलरमध्ये येतो.

वाचाः

Oppo A33 चे खास वैशिष्ट्ये
ओप्पोच्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा होल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याची स्क्रीन रिझॉल्यूसन 720×1600 पिक्सल आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४६० ऑक्टा कोर प्रोसेसर दिला आहे. हँडसेटमध्ये ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. ओप्पोच्या या फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. ओप्पोच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here