नवी दिल्लीः Oppo ने आपले बजेट स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने ए सीरीज, एफ सीरीज आणि रेनो ३ प्रो स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली आहे. , , आणि च्या किंमतीत २ हजार रुपयांची कपात केली आहे. महेश टेलिकॉमने ओप्पोच्या या फोनच्या किंमतीत कपात करण्यात आल्याची माहिती ट्विट करून दिली आहे.

वाचाः

ओप्पो ए12 आणि ओप्पो ए15 च्या किंमतीत कंपनीनी एक हजार रुपयांची कपात केली आहे. ओप्पो ए १२ च्या ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज व्हेरियंटच्या किंमतीत १ हजार रुपयांच्या सूटनंतर ८ हजार ९९० रुपयात खरेदी करता येवू शकतो. तर ओप्पो ए १५ च्या २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनला १ हजार रूपयांच्या सूटनंतर ८ हजार ९९० रुपयांत खरेदी करु शकता. ए १५ ए चा ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजचा फोन १ हजार रुपयांच्या सूटनंतर ९ हजार ९९० रुपयांत खरेदी करू शकतो.

वाचाः

नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या ओप्पो एफ १७ च्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेजच्या फोनच्या किंमतीत ५०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. या कपातीनंतर हा फोन १८ हजार ४९० रुपयांत खरेदी करू शकता. तर ओप्पो रेनो ३ प्रोच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनवर १ हजार रुपयांची सूट दिली असून यानंतर हा फोन २४ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येवू शकतो. या हँडसेटच्या ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनवर २ हजार रुपयांच्या कपातीनंतर २७ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येवू शकतो.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here