भारतात लाँच करण्यात आलेला हा फोन ६ जीबी रॅमचा असून याची किंमत ३८ हजार ९९९ रुपये आणि ८ जीबी रॅम च्या फोनची किंमत ४० हजार ९९९ रुपयांत लाँच करण्यात आली आहे. ऑरा ग्लो, ऑरा ब्लॅक आणि ऑरा रेड या तीन रंगात हा फोन लाँच करण्यात आला आहे. कंपनीने या फोनवर ५ हजार रुपयांचा आकर्षक अपग्रेड ऑफर्स दिला आहे. या ऑफरमुळे या फोनची किंमत ३३ हजार ९९९ रुपये इतकी होणार आहे. कंपनीने आजपासून या फोनची प्री बुकिंग सुरू केली आहे. ३ फेब्रुवारी पासून हा फोन ऑनलाइन आणि रिटेल स्टोर्समध्ये तसेच सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवरून हा फोन खरेदी करता येवू शकणार आहे. या फोनमध्ये ६.७ इंचाचा सुपर AMOLED एज-टूएज इनफिनिटी – ओ डिस्प्ले दिला आहे. ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम या दोन पर्यायामध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे. या फोनचे स्टोरेज १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज वाढवता येऊ शकतो.
या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेराचा सेटअप दिला आहे. यात पहिला १२ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सह १२ मेगापिक्सलचे दोन कॅमेरे दिले आहे. हाय मोशन व्हिडिओ शूट करण्यासाठी कॅमेऱ्यात अॅपचा खास मोड देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी पोर्ट्रेटमध्ये बदलता येऊ शकतो, हे या फोनचे खास वैशिष्ट्ये आहे. फोनमध्ये ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times