नवी दिल्लीः भारतीय स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सकडून नुकतेच दोन डिव्हाइस आणि Micromax In 1B लॉन्च करण्यात आले आहे. जवळपास दोन वर्षानंतर कमबॅक करीत आहे. इन सीरीज अंतर्गत दोन नवीन स्मार्टफोन कमी किंमतीत पॉवरफुल फीचर्ससोबत आले आहेत. मायक्रोमॅक्स ब्लॉटवेयर फ्री एक्सपीरियन्स युजर्सला देण्यासाठी यात कोणतेही प्री इन्स्टॉल अॅप्स देत नाही. जास्त पॉवरफुल Micromax In Note 1 चा आज पहिला सेल आहे.

वाचाः

किंमत आणि ऑफर्स
Micromax In Note 1 चा आज दुपारी १२ वाजता शॉपिंग प्लॅटफॉर्मवर फ्लिपकार्ट आणि मायक्रोमॅक्सची अधिकृत वेबसाइटवरून हा फोन खरेदी करता येवू शकतो. फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. तर ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १२ हजार ४९९ रुपये आहे. हे डिव्हाईस ग्राहकांना पांढऱ्या आणि हिरव्या रंगात खरेदी करता येवू शकते.

वाचाः

फ्लिपकार्टवरून खरेदी केल्यास ग्राहकांना फेडरल बँक डेबिट कार्ड्स वर १० टक्के डिस्काउंट मिळणार आहे. तसेच फ्लिपकार्टवर अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर ५ टक्के कॅशबॅक आणि अॅक्सिस बँक बज क्रेडिट कार्डवर ५ टक्के डिस्काउंट ऑफर केला जात आहे. ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन दिला आहे.

वाचाः

Micromax In Note 1 चे खास फीचर्स
स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा IPD LCD डिस्प्ले फुल HD+ रेजॉलूशन सोबत मिळतो. फोन MediaTek Helio G85 प्रोसेसर दिला आहे. In Note 1 च्या रियर पॅनलवर AI क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी, ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. १६ मेगापिक्सलचा फ्रंट सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here