नवी दिल्लीः ओप्पोने आपला बजेट स्मार्टफोन च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. त्यामुळे या फोनची किंमत आता १० हजार रुपयांपेक्षा कमी झाली आहे. ओप्पोने गेल्या महिन्यात OPPO A15 च्या 3 GB RAM आणि 32 GB स्टोरेज व्हेरियंटला १० हजार ९९० रुपये किंमतीत लाँच केले होते. आता या फोनच्या किंमतीत १ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. यानंतर या फोनची किंमत ९ हजार ९९० रुपये झाली आहे.

वाचाः

ओप्पोच्या या २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ९ हजार ४९० रुपयांत लाँच केले होते. याच्या किंमतीत ५०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. आता याची किंमत ८ हजार ९९० रुपये झाली आहे. ओप्पोच्या या बजेट फ्रेंडली फोनला अॅमेझॉनवरून खरेदी करू शकता. ओप्पोच्या या फोनमध्ये जबरदस्त फीचर्स आहेत.

वाचाः

अनेक जबरदस्त ऑफर्स
जर OPPO A15 ला अॅमेझॉनवरून खरेदी केल्यास तुम्हाला बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्ड, फेडरल बँकच्या डेबिट कार्ड आणि एयू बँकेच्या डेबिट कार्ड वर १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळतो. HSBC credit card EMI ट्रान्झक्शन वर १५०० रुपयांपर्यंत सूट मिळते. डायनामिक ब्लॅक आणि मिस्ट्री ब्लू कलर ऑप्शन मध्ये लाँच करण्यात आलेल्या ओप्पो ए १५ ला मीडियाटेक हीलियो पी ३५ चिपसेट सोबत लाँच करण्यात आले होते. ओप्पोच्या या फोनची शाओमी, विवो, मायक्रोमॅक्स, रियलमी सह अन्य कंपन्यांच्या बजेट स्मार्टफोन्ससोबत टक्कर होणार आहे.

वाचाः

OPPO A15 काय खास आहे
या फोनमध्ये ६.५२ इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिला आहे. ज्यात टियरड्रॉप नॉच आहे. या फोनची स्क्रीन रिझॉल्यूशन 720×1600 पिक्सल आहे. ओप्पोच्या या फोनला २ जीबी रॅम आणि ३ जीबी रॅम ऑप्शन मध्ये लाँच करण्यात आले होते. या फोनमध्ये 4230mAh बॅटरी दिली आहे. १० वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात १३ मेगापिक्सलचा कॅमेरा तसेच २-२- मेगापिक्सलचे डेप्थ सेन्सर आणि मायक्रो लेन्स सोबत येते. या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here