नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी खासगी कंपनी रिलायन्स जिओने आपल्या युजर्संसाठी वेगवेगळे प्रीपेड प्लान आणले आहेत. जिओच्या या प्लानमध्ये युजर्संना ३ हजार FUP मिनिट्सची कॉलिंग मिळणार आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलचा सुद्धा असाच एक प्लान आहे. परंतु, जिओचा प्लान हा थोडा वेगळा आहे. जाणून घ्या प्लानसंबंधी.

वाचाः

जिओचा ५९९ रुपयांचा प्रीपेड प्लान
जिओच्या या प्लानमध्ये युजर्संना रोज २ जीबी डेटा मिळतो. जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तसेच नॉन जिओवर ३ हजार FUP मिनिट मिळते. युजर्संना रोज १०० एसएसएस मिळतात. तसेच जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. युजर्संना यात एकूण १६८ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो.

वाचाः

रिलायन्स जिओचा ५५५ रुपयांचा प्रीपेड प्लान
जिओच्या ५५५ रुपयांच्या या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा आमि जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. नॉन जिओ नेटवर्कवर युजर्संना ३ हजार FUP मिनिट्स मिळते. या प्लानमध्ये सुद्धा रोज १०० एसएमएस मिळतात. तसेच सर्व जिओ अॅप्सचे कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन मिळते. या प्लानची वैधता सुद्धा ८४ दिवसांची आहे. परंतु, या प्लानमध्ये युजर्संना एकूण १२६ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो.

वाचाः

रिलायन्स जिओचा ९९९ रुपयांचा प्रीपेड प्लान
जिओचा ९९९ रुपयांच्या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्संना रोज ३ जीबी डेटा मिळतो. रोज १०० एसएमएस, जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग, तर नॉन जिओवर ३ हजार FUP मिनिट्स मिळते. युजर्संना कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्सन मिळते. या प्लानमध्ये युजर्संना एकूण २५२ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here