वाचाः
Moto E7 चे वैशिष्ट्ये
मोटोच्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. तसेच MediaTek Helio G25 SoC प्रोसेसर सोबत या फोनला लाँच केले आहे. २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज मध्ये लाँच केलेल्या या फोनची स्टोरेज ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. अँड्रॉयड १० वर बेस्ड असलेल्या या फोनला पॉवर देण्यासाठी 4000mAh ची बॅटरी दिली आहे. १० वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. या फोनमध्ये माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि अन्य फीचर्स दिले आहेत.
वाचाः
कॅमेरा कसा
मोटोच्या या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेराचा ड्यूल रियर कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये सेकंडरी रियर कॅमेरा २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. सध्या हा फोन युरोपच्या मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्यानंतर लॅटिन अमेरिका, मिडल ईस्ट आणि आशियाच्या अन्य देशासोबत भारतात सुद्धा हा फोन लाँच केला जावू शकतो. भारतात लाँच करण्यात आल्यानंतर या फोनची टक्कर रियलमी, ओप्पो, विवो, मी आणि सॅमसंगच्या अन्य बजेट समार्टफोनसोबत होईल.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times