वाचाः
किंमत आणि ऑफर्स
Micromax In 1b ला कंपनीने दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरियंट्समध्ये लाँच केले आहे. आधी २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ६९९९ रुपये ठेवली आहे. तर ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. एसबीआय क्रेडिट कार्ड्सवरून ईएमआय ट्रान्झॅक्शन केल्या ५ टक्के कॅशबॅक, फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरून युजर्संना ५ टक्के कॅशबॅक आणि अॅक्सिस बँक बज क्रेडिट कार्ड युजर्संना ५ टक्के डिस्काउंट मिळणार आहे. फोनला नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येणार आहे.
वाचाः
Micromax In 1b फोनची वैशिष्ट्ये
या फोनमध्ये ६.५२ इंचाचा IPS LCD डिस्प्ले HD+ रेजॉलूशन (1600×720 पिक्सल्स) सोबत दिले आहे. यात वॉटरड्रॉप स्टाइल नॉच मिळतो. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिला असून फोनमध्ये मीडियाटेक चा Helio G35 ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला आहे.
वाचाः
फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सरचा ड्यूल कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी दिली आहे. १० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते.
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times