नवी दिल्लीः ऑडियो प्रोडक्ट्सचे मार्केट गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. भारतात ऑडियो वियरेबल्स खूप प्रसिद्ध आहे. इंडियन युजर्ससाठी नवीन स्मार्टफोन्स प्रमाणे ऑडियो प्रोडक्ट्सची डिमांड वाढत आहे. काउंटरपॉइंट कडून शेयर करण्यात आलेला डेटा पाहिल्यास २०२० च्या तिसऱ्या तिमाहीत भारतातील मार्केट ची ग्रोथ ७२३ टक्के झाली आहे. याशिवाय शाओमी, रियलमीला मागे टाकून boAT पुढे गेला आहे.

वाचाः

काउंटरपॉइंटकडून शेयर करण्यात आलेला मार्केट डेटा समोर आला आहे. वियरेबल सेगमेंट त्या सेक्टर्समध्ये सहभागी आहे. ज्यावर करोना व्हायरस महामारीमुळे मिळालेली इकॉनॉमिक स्लोडाउनचा कोणताही परिणाम झाला नाही. असंख्य लोक मल्टिमीडियाचा आनंद घेताना दिसत आहे. त्यामुळेच या सेगमेंटमध्ये भारतात आतापर्यंत सर्वात जास्त शिपमेंट २०२० च्या तिसऱ्या तिमाहीत जुलै ते सप्टेंबर या दरम्यान पाहायला मिळाली आहे.

वाचाः

इंडियन ब्रँड बनले नंबर वन
जुलै-सप्टेंबर २०२० या दरम्यान सर्वात जास्त परफॉर्म करणाऱ्या ब्रँड्समध्ये भारतीय इलेक्ट्रॉनिक मॅन्यूफॅक्चरिंग boAT नंबर वन बनली आहे. १८ टक्के मार्केट शेयर सोबत boAT ने शाओमी आणि रियलमीला मागे टाकले आहे. boAT चे इयरपॉड्स ४४१ मॉडलला तिसऱ्या तिमाहीत विकणारा दुसरा सर्वात जास्त विकणारा इयरबड्स बनले आहे. यात वॉटर रेसिस्टेंस, जबरदस्त साउंड क्वॉलिटी, यूएसबी टाइप सी चार्जिंग आणि २५ तासांची बॅटरी लाईफ यासारखे फीचर्स दिले आहे.

वाचाः

या कंपन्या टॉप ५ मध्ये
दुसऱ्या पोझिशनवर १६ टक्के मार्केट शेयर सोबत शाओमीने कब्जा केला आहे. शाओमीकडून लाँच करण्यात आलेल्या Redmi Earbuds 2C यावेळी टॉप सेलिंग मॉडल बनला आहे. याला ९९९ रुपयांच्या प्रमोशनल किंमतीशिवाय अडवॉन्स्ड फीचरसोबत बाजारात उतरवले आहे. रियलमीने १३ टक्के मार्केट शेयरवर कब्जा केला आहे. तिसऱ्या पोझिशनवर आहे. चौथ्या आणि पाचव्या स्थानावर जेबीएल आणि अॅपल ८ टक्के आणि ६ टक्के मार्केट शेयर सोबत आहेत.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here