नवी दिल्लीः इनफिनिक्स झीरो 8i स्मार्टफोनला भारतात येत्या ३ डिसेंबर रोजी लाँच करण्यात येणार आहे. कंपनीने या फोनसंबंधी आधीच घोषणा केली आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानात ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा फोन लाँच करण्यात आला आहे. फोनच्या याच व्हेरियंटला भारतात लाँच करण्याची शक्यता आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या फोनमधम्ये एक क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. ज्यात मेन कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा असणार आहे. तसेच फोनमध्ये दोन सेल्फीसाठी दोन लेन्स दिले जाणार आहे.

वाचाः

या फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G90T प्रोसेसर दिला आहे. कंपनीने सोशल मीडियावर याची घोषणा केली आहे. इनफिनिक्स झीरो ८आय ला येत्या ३ डिसेंबर रोजी भारतात लाँच करण्यात येणार आहे. infinix zero 8 चे अपग्रेड व्हर्जन आहे स्मार्टफोन. या फोनला ऑगस्ट महिन्यात लाँच करण्यात आले होते. कंपनी एक अँड्रॉयड टीव्ही आणि एक स्नोकोर ब्रँडेड साउंडबार सुद्धा डिसेंबर महिन्यात लाँच करू शकते. परंतु, याच्या लाँचिंगची तारीख अद्याप समोर आली नाही.

वाचाः

इनफिनिक्स स्मार्टफोनला पाकिस्तानात लाँच केले होते. या स्मार्टफोनला सिंगल व्हेरियंटमध्ये लाँच केले असून ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज मॉडलची किंमत १६ हजार ३०० रुपये ठेवण्यात आली होती. या फोनला ब्लॅक डायमंड, ग्रीन डायमंड आणि सिल्वर डायमंड कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आले होते. या फोनला याच किंमतीत भारतात सुद्धा लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या फोनला याच कलरमध्ये आणले जावू शकते.

वाचाः

या फोनमध्ये ६.८५ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले प्लस दिला आहे. ज्यात सेल्फी आणि कॅमेरा सेटअपसाठी ड्यूल पंचहोल कट आउट आणि 90Hz रिफ्रेश रेट आहे. या फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G90T प्रोसेसर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500mAh बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स दिला आहे. यात अल्ट्रा वाइड अँगल लेन्स सोबत ८ मेगापिक्सलचा सेन्सर, २ मेगापिक्सलचा तिसरा सेन्सर आणि एक एआय सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी एक १६ मेगापिक्सलचा तर दुसरा ८ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here