नवी दिल्लीः रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन-आयडिया आणि बीएसएनएल देशातील टॉप टेलिकॉम कंपन्या आहेत. या कंपन्यांनी आपल्या युजर्संच्या गरजेनुसार, वेगवेगळ्या वैधतेचे प्रीपेड प्लान आणले आहेत. अनेक युजर्स लाँग टर्म प्रीपेड पॅकसाठी आग्रही असतात कारण त्यांना वारंवार रिचार्ज करणे कठीण काम वाटते. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी Jio, , Vi आणि च्या अशाच लाँग टर्म प्लानसंबंधी माहिती देणार आहोत.

वाचाः

रिलायन्स जिओचा २५९९ रुपयांचा प्रीपेड प्लान
रिलायन्स जिओकडे अनेक लाँग टर्म प्लान उपलब्ध आहेत. २५९९ रुपयांचा पॅक सर्वात चांगला प्लान आहे. या पॅकमध्ये कंपनी रोज २ जीबी डेटा शिवाय १० जीबी बोनस डेटा ऑफर करते. या प्लानमध्ये जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड तर नॉन जिओ नेटवर्कवर १२ हजार एफयूपी मिनिट्स मिळतात. ग्राहकांना रोज १०० एसएमएस मिळते. तसेच जिओ अॅप्स आणि डिज्नी हॉटस्टार व्हीआयपीची एक वर्षापर्यंत मेंबरशीप फ्रीमध्ये मिळते. जिओचा हा प्लान ३६५ दिवस म्हणजेच वर्षभराच्या वैधतेसोबत येतो.

वाचाः

एअरटेलचा २६९८ रुपयांचा प्रीपेड प्लान
एअरटेलकडे २६९८ रुपयांचा लाँग टर्म प्लान आहे. याची वैधता ३६५ दिवसांची आहे. या पॅकमध्ये रोज २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय, जिओ पॅकमध्ये १०० एसएमएस रोज व डिज्नी प्लस हॉटस्टारचे एक वर्षापर्यंतचे सब्सक्रिप्शन फ्री दिले जाते. तसेच ग्राहकांना एअरटेल थँक्सचे बेनिफिट्स या प्लानमध्ये मिळते.

वाचाः

वोडाफोन-आयडियाचा २५९५ रुपयांचा प्लान
वोडाफोन-आयडियाचा लाँग टर्म प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. या पॅकमध्ये २ जीबी डेली डेटा दिला जातो. याशिवाय, अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, आणि १०० एसएमएस दिले जाते. ग्राहकांना Zee5 प्रीमियम आणि Vi Movies & TV चे एक वर्षापर्यंत सब्सक्रिप्शन मिळते.

वाचाः

BSNL चा १९९९ रुपयांचा प्लान
१९९९ रुपयांचा प्लानची वैधता ४२५ दिवसांची आहे. म्हणजेच या प्लानची वैधता सर्व कंपन्यांपेक्षा जास्त आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग (रोज २५० मिनिट) ऑफर करते. तसेच रोज ३ जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळते. युजर्संना Eros Now आणि Lokdhum कॉन्टेन्ट चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here