नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) विकसित केलेल्या नेव्हिगेशन प्रणालीचा वापर करणारे मोबाइल भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहेत. शाओमी आणि रिअलमी या दोन मोबाइल कंपन्यांच्या मोबाइलमध्ये भारतीय जीपीएस प्रणाली असणार आहे.

इस्रोने नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टलेशनला (NavlC) सपोर्ट करणारे स्मार्टफोन लाँच करणार आहे. NavlC हे जीपीएससाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचे भारतीय रुप आहे. प्रोसेसर बनवणारी कंपनी क्वालकॉमने स्नॅपड्रॅगन ४,६,७ सीरीजच्या तीन नवीन चिपसेट्स लाँच केले होते. स्नॅपड्रॅगनचे ७२० जी, ६६२ आणि ४६० चिपसेट NavlC ला सपोर्ट करतात. त्यामुळे आता या चिपसेट्ससह येणाऱ्या मोबाइलमध्ये NavlC वापरता येणे शक्य आहे.

शाओमीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक मनू जैन यांनी सांगितले की, कंपनी लवकरच टॉप-एन्ड स्नॅपड्रॅगन ७२०जी प्रोसेसरवर काम करणारे स्मार्टफोन लाँच करणार आहे. तर, रिअलमीचे सीईओ माधव सेठ यांनी सांगितले की, रिअलमी स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसर असणारा मोबाइल लाँच करणारी पहिली कंपनी असणार आहे. रिअलमी ६६५ स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असणाऱ्या रिअलमी ५ सीरीजसह लाँच करणार आहे.

जीपीएसशिवाय इतरही आहे
स्मार्टफोन युजर्समध्ये जीपीएस लोकप्रिय आहे. मात्र, फक्त जीपीएस एकमात्र नेव्हिगेशन सिस्टीम नाही. रशियाची GLONASS ही स्वत: ची नेव्हिगेशन सिस्टीम आहे. तर, युरोपियन युनियनमध्ये गॅलिलिओ आणि चीनमध्ये BeiDou या नेव्हिगेशनचा वापर होतो.

जीपीएसपेक्षा जास्त अचूक असणार NavIC
NavIC हा जीपीएसपेक्षा अधिक अचूक असणार आहे. NavICची पोजिशन अॅक्युरन्सी ५ मीटर असणार आहे. NavIC हा ड्युअल फ्रिक्वेंसीवर (एस आणि एल बँड) काम करतो. तर, जीपीएस फक्त एल बँडवर काम करतो.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here