मुंबई: जगात सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या व्हॉट्सअॅप हा मेसेजिंग अॅप अनेकांच्या मोबाइलमध्ये आहे. हा अॅप आतापर्यंत जगात ५ अब्जाहून अधिकजणांनी डाउनलोड केला आहे. फेसबुकनंतर एवढ्याजणांनी डाउनलोड केलेला हा दुसरा अॅप आहे. फेसबुकच्या मालकीचे असणाऱ्या या अॅपमध्येही काही कमतरता आहेत.

व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सना मेसेजिंगचा चांगला अनुभव देण्यासाठी अनेकदा अपडेट्स देत असतात. नवीन प्रयोगही होतात. मात्र, तरीही काही फिचर्स व्हॉट्सअॅपमध्ये दिसत नाहीत. जाणून घेऊयात ही पाच फिचर्स

डार्क मोडअनेकदा या फिचर्सबाबत चर्चा सुरू असते. व्हॉट्सअॅपवर हे फिचर्स येणार असल्याची माहिती अनेकदा समोर आली. मात्र, हे फिचर्स व्हॉट्सअॅपमध्ये आले नाही. टेलिग्रामा आणि सिग्नल सारख्या अॅपमध्ये डार्क मोड फिचर आहे.

फाइल साइज
व्हॉट्स अॅपवर अधिकाधिक १०० एमबीची फाइल अन्य युजर्ससोबत शेअर करू शकतो. तर, टेलिग्रामवर १.५ जीबीपर्यंतची फाइल शेअर करू शकतो. त्यामुळे अनेक युजर्स यासाठी टेलिग्रामचा वापर करतात.

सेल्फ डिस्ट्रक्ट टाइमर
टेलिग्राममध्ये सेल्फ डिस्ट्रक्ट टाइमर हे फिचर आहे. या फिचरमुळे युजर्स पाठवलेला मेसेज डिलीट करण्यासाठी वेळ ठरवू शकतात. या वेळेनंतर मेसेज पाठवणारा आणि स्विकारणाऱ्याच्या अकाउंटमधून तो मेसेज डिलीट होतो.

रिस्ट्रिक्ट स्पेसिफिक कंटेंट
व्हॉट्सअॅपचा हा खास फिचर ग्रुप आहे. ग्रुपमधील सदस्य कोणत्याही विषयाशी निगडित चर्चा करू शकतात, फाइलही शेअर करू शकतात. व्हॉट्सअॅपमध्ये युजर्सना कंटेंट रिस्ट्रिक्शनचा पर्याय नाही. टेलिग्रामवर कंटेंटवर बंधने, मर्यादा आणण्याचा पर्याय आहे. उदाहरणार्थ एखादा युजर जीआयएफ फाइलवर बंधने आणू शकतो. पोल घेण्यासही मज्जाव करता येऊ शकतो.

स्टिकर पॅक युजर्ससाठी स्टिकर पॅकची पर्याय देतो. मात्र, त्यातून मिळणारे स्टिकर्स खूपच कमी आहेत. तर, टेलिग्रामवर युजर्सना अनेक स्टिकर्स उपलब्ध आहेत.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here