एमआयच्या या राउटरवर तब्बल ६४ डिव्हाइस जोडता येणार आहे. त्या डिव्हाइसना तब्बल ३०० एमबीपीएसचा स्पीड मिळणार आहे. या राउटरमध्ये बँडविड्थ ऑप्टिमायजेशन टूल आणि पॅरेंटल कंट्रोल फीचर उपलब्ध आहेत. शाओमीचा हा राउटर २.४Ghz वायफाय ८०२.११ सह उपलब्ध आहे. त्यामुळे इंटरनेटचा ३०० एमबीपीएस स्पीड हा राउटर देऊ शकतो. ६४एमबी, DDR2 रॅम आणि १६ एमबी नॉर फ्लॅश ROM सह या राउटरमध्ये मीडियाटेक MT7628N प्रोसेसर आहे.
शाओमीच्या या राउटरमध्ये ६४ डिव्हाइस कनेक्ट करता येऊ शकतात. साधारणपणे एका साधारण राउटरपेक्षा ८ पट अधिक क्षमता असल्याचा दावा कंपनीने केला आहे. राउटरमध्ये असणाऱ्या वायफाय ऑप्टिमायझेशन फीचरमधून वायफाय स्पीड वाढवता येऊ शकतो. त्याशिवाय यामध्ये एक बिल्ट इन रिपीटर मोड आहे. ज्याच्यामुळे राउटर कव्हरेज वाढवता येऊ शकतो.
किंमत किती ?भारतात या राउटरची विक्री सुरू झाली आहे. याची किंमत ११९९ रुपये असून १७ टक्के सवलतीच्या दरात या राउटर खरेदी करता येऊ शकतो. त्यामुळे सवलतीच्या दरात हा राउटर ९९९ रुपयांना खरेदी करता येऊ शकतो.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times