नवी दिल्लीः WhatsApp ने आज आपल्या युजर्ससाठी एक नवीन अपडेट रोलआउट जारी केले आहे. या अपडेटमध्ये युजर्संना नवीन अॅनिमेटेड स्टिकर पॅक मिळणार आहे. याशिवाय, युजर्सला या अपडेट सोबत नवीन वॉलपेपर सुद्धा मिळणार आहे.

वाचाः

स्टिकर सर्च करण्याचा मिळणार ऑप्शन
या अपडेट द्वारे युजर्संना एक नवीन फीचर सुद्धा मिळणार आहे. याची खूप दिवसांपासून वाट पाहिली जात आहे. आता युजर्संना व्हॉट्सअॅपवर स्टिकर सर्च करण्याचा ऑप्शन मिळणार आहे. व्हॉट्सअॅप स्टिकर्स युजर्स दरम्यान खूप प्रसिद्ध आहे. याचा वापर चॅटिंग आणखी मजेदार करण्यासाठी केला जावू शकतो.

वाचाः

‘टुगेदर एट होम’ स्टिकर पॅक
व्हॉट्सअॅपवर नवीन स्टिकर पॅक मध्ये WHO चे टूगेदर अॅट होम स्टिकर्स युजर्सला मिळणार आहे. व्हॉट्सअॅपच्या म्हणण्यानुसार, हे स्टिकर पॅक या प्लॅटफॉर्मवर सर्वात प्रसिद्ध आहेत. आता नवीन अपडेट सोबत पॅक मध्ये नवीन अॅनिमिटेड स्टिकर्स जोडले जाणार असून यामुळे चॅटिंगची मज्जा दुप्पट मिळणार आहे.

वाचाः

९ भाषेत मिळणार स्टिकर्स
हे स्टिकर्स युजर्संना ९ भाषेत मिळणार आहे. यात अरबी, फ्रेंच, जर्मन, इंडोनेशियन, इटालियन, पोर्तूगिज, रशियन, स्पॅनिश आणि तुर्कीश या भाषेचा समावेश आहे. या भाषेचा वापर युजर्स चॅटिंग दरम्यान करू शकतात.

वाचाः

कसे वापर कराल स्टिकर सर्च ऑप्शन
स्टिकर सर्च ऑप्शनचा वापर खूप सोपा आहे. युजर्स इमोजी आणि जीफ चा वापर करतात त्याच प्रमाणे ट्रिकने आता तुम्ही स्टिकर सुद्धा सर्च करू शकतात. यासाठी तुम्हाला केवळ टाइप करावे लागणार आणि तुमच्या चॅटशी संबंधित स्टिकर समोर दिसल्यानंतर त्याला टॅप करून याला रिसिवरला पाठवू शकता.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here