वाचाः
फिनलँडची कंपनी ने काही आठवड्यापूर्वी भारतात एन्ट्री लेवल स्मार्टफोन Nokia C3 ला लाँच केले होते. या फोनला ७ हजार ४९९ रुपयांत लाँच केले होते. परंतु, आता या फोनला स्वस्तात खरेदी करता येवू शकते. Nokia C3 चे दोन व्हेरियंट आहेत. या दोन्ही व्हेरियंटच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. Nokia C3 च्या बेस व्हेरियंटमध्ये २ जीबी रॅम प्लस १६ जीबी स्टोरेज तर टॉप व्हेरियंटची ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज दिला आहे.
वाचाः
Nokia C3 च्या बेस व्हेरियंटची किंमत डिस्काउंटनंतर ६ हजार ९९९ रुपये झाली आहे. यावर ५०० रुपये कमी करण्यात आले आहे. तर नोकियाच्या या ३ जीबी रॅमच्या फोनची किंमत १ हजार रुपयांनी स्वस्त करण्यात आली आहे. Nokia C3 च्या 3GB व्हेरियंटची किंमत ८ हजार ९९९ रुपये होती. आता ती ७ हजार ९९९ रुपये झाली आहे. मुंबईतील महेश टेलिकॉम च्या माहितीनुसार या दोन्ही व्हेरियंट्सची किंमत कमी करण्यात आली आहे.
वाचाः
हा स्मार्टफोन आता स्वस्त किंमतीत ऑफलाइन आणि ऑनलाइन रिटेलर्स साठी लागू होणार आहे. या फोनमध्ये प्योर अँड्रॉयड अनुभव मिळणार आहे. या किंमतीत नोकियाचा फोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. Nokia C3 एक एन्ट्री लेवलचा स्मार्टफोन आहे. ज्यात ५.९९ इंचाचा एचडी डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेशियो 5.99 इंच आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर Spredtrum प्रोसेसर दिला आहे. तसेच IM8322 जीपीयू दिला आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times