नवी दिल्ली : Apple iPhones महागड्या किंमतीमुळे प्रत्येकालाच वापरणं शक्य होत नाही. पण कंपनी आपला हा प्रीमिअम फोन लवकरच कमी किंमतीत उपलब्ध करुन देणार आहे. यामुळे जास्तीत जास्त युझर्सला हा फोन खरेदी करता येईल. मार्च २०२० मध्ये म्हणजे पुढच्या दोन महिन्यात हा फोन लाँच होणार असल्याचीही माहिती आहे. काही वृत्तांनुसार, OnePlus 7T या प्रीमिअम स्मार्टफोनपेक्षाही आयफोनची किंमत कमी असेल असं बोललं जात आहे. त्यामुळे प्रीमिअम अँड्रॉईड फोनपेक्षाही स्वस्त घेणं शक्य होणार आहे.

नव्या आयफोनबाबत अनेकदा लीक रिपोर्ट्स समोर आले आहेत. आगामी आयफोन हा iPhone SE 2 या नावाने असेल असंही बोललं जात होतं. पण कंपनी हा नवीन आणि स्वस्त आयफोन नावाने आणणार असल्याची माहिती आहे. २०१७ मध्ये लाँच केलेला आयफोन ८ सारखाच आयफोन ९ असेल असंही बोललं जात आहे. पण या नव्या आयफोनचं वैशिष्ट्य म्हणजे आयफोन ११ चे फीचर्सही यामध्ये असतील.

आयफोन ९ मध्ये आयफोन ११ मध्ये वापरण्यात आलेला A13 बायॉनिक चिपसेट दिलं जाणार आहे. इतर फीचर्समध्ये टच आयडी होम बटण, ४.७ इंच आकाराचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी १२ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा असेल. आयफोन ११ मध्ये वापरलेली वायरलेस चार्जिंग फीचर असणारी बॅटरीही यामध्ये दिली जाण्याची शक्यता आहे.

आयफोन लाँच होण्याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण मार्च २०२० पूर्वीच हा फोन बाजारात येईल अशी शक्यता आहे. शिवाय हा फोन सर्वात अगोदर भारतीय बाजारात लाँच केला जाऊ शकतो. या फोनमध्ये दोन व्हेरिएंट येऊ शकतात. ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३९९ डॉलर म्हणजे जवळपास २८ हजार रुपये, तर १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४४९ डॉलर म्हणजेच ३२ हजार रुपये असू शकते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

163 COMMENTS

  1. Thank you for content. Area rugs and online home decor store. Hello Administ . Onwin , Onwin Giriş , Onwin Güncel Giriş , Onwin Yeni Adres , onwin

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here