नवी दिल्लीः ओप्पोने आपली Reno 5 Series लाँच केली आहे. या सीरीज अंतर्गत कंपनीने दोन स्मार्टफोन Oppo Reno 5 आणि Reno 5 Pro लाँच केले आहेत. दोन्ही फोनमध्ये पंचहोल डिस्प्ले आणि चार रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. कंपनीने या दोन्ही स्मार्टफोनला सध्या चीनमध्ये लाँच केले आहे. चीनमध्ये ओप्पो रेनो ५ ५जी ची सुरुवातीची किंमती २६९९ युआन म्हणजेच जवळपास ३० हजार ४०० रुपये आणि ओप्पो रेनो ५ प्रो ५जी ची सुरुवातीची किंमत ३३९९ युआन म्हणजेच ३८ हजार ३०० रुपये किंमत आहे. चीनमध्ये या दोन्ही स्मार्टफोनचा सेल १८ डिसेंबर पासून सुरू होणार आहे.

वाचाः

ओप्पो रेनो ५ प्रो चे खास वैशिष्ट्ये
फोनमध्ये 2400×1080 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत ६.५५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनचा डिस्प्ले 90Hz के रिफ्रेश रेट आहे. १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिला आहे. फोनमध्ये मीडियाटेक Dimensity 1000+ चिपसेट दिला आहे.

वाचाः

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एक २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि एक २ मेगापिक्सलचा मोनो पोट्रेट लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी या फोनमध्ये 4350mAh बॅटरी दिली आहे. हा फोन ६५ वॉटच्या सुपल फ्लॅश चार्ज सपोर्ट सोबत येतो. हा फोन अँड्रॉयड ११ वर बेस्ड ColorOS 11.1 वर काम करतो.

वाचाः

ओप्पो रेनो ५ चे खास वैशिष्ट्ये
या फोनमध्ये 2400×1080 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.४३ इंचाचा फुल एचडी प्लस ओलेड डिस्प्ले दिला आहे. हा फोन 90Hz के रिफ्रेश रेट सोबत येतो. फोनमध्ये १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 765 5G प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत एक ८ मेगापिक्सलचा आणि दोन २ मेगापिक्सलचे कॅमेरे दिले आहेत. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला असून फोनला पॉवर देण्यासाठी यात 4350 mAh ची बॅटरी दिली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here