वाचाः
या अपकमिंग स्मार्टफोनचे लँडिंग पेज mi.com वर लाइव करण्यात आला आहे. यानुसार, फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, मोठी बॅटरी, स्नॅपड्रॅगन प्रोसेसर सह अनेक जबरदस्त फीचर्स दिले जाणार आहेत. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, भारतात लाँच होणाऱ्या या हा चीनमध्ये लाँच झालेल्या रेडमी नोट ९ ४जी चा रिब्रँडेड व्हर्जन असणार आहे.
वाचाः
फोनच्या लाँचिंगच्या तारखेची माहिती शाओमी इंडिया चे हेड मनू कुमार जैन यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये रेडमी ९ पॉवरला रेडमीचा पहिला #Power फोन म्हटले आहे.
वाचाः
रेडमी ९ पॉवर चे खास वैशिष्ट्ये
फोनमध्ये 90.34 टक्के स्क्रीन टू बॉड़ी रेशियो आणि 19.5:9 च्या आस्पेक्ट रेशियो सोबत ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज ऑप्शन मध्ये येणाऱ्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६६२ चिपसेट दिला आहे. ही माहिती टिप्स्टर ईशान अग्रवाल यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे.
वाचाः
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 6000mAh ची बॅटरी दिली आहे. फोनला १८ वॉटच्या फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times