नवी दिल्लीः विवोचा नवीन स्मार्टफोन लवकरच मार्केटमध्ये एन्ट्री करणार आहे. नुकतेच या फोनला BIS म्हणजेच ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ने सर्टिफाय केले आहे. आता असे मानले जात आहे की, विवोचा हा फोन लवकरच भारतात लाँच करण्यात येणार आहे. विवो वाय १२ च्या या अपग्रेडेट व्हर्जनला कंपनीने गेल्या महिन्यात इंडोनेशिया, जॉर्डन आणि व्हिएतनाम या देशात लाँच केलेले आहे.

वाचाः

या फोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा, मीडियाटेक हीलियो प्रोसेसर आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट यासारखे फीचर्स दिले आहेत. टिप्स्टर मुकुल शर्मा यांनी एक ट्विट केले असून या फोनच्या बीआयएस सर्टिफाइड झाल्याची माहिती दिली आहे. तसेच शेयर करण्यात आलेला स्क्रीनशॉट मध्ये पाहिले जावू शकते की, या फोनचे मॉडल नंबर V2026 आहे. काही महिन्याआधी या मॉडल नंबरच्या डिव्हाईसला गुगल प्ले कन्सोल वर पाहिले गेले आहे.

वाचाः

विवो Y12s चे वैशिष्ट्ये
या फोनमध्ये 1600×720 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५१ इंचाचा एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. ४ जीबी रॅम सोबत येणाऱ्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो P35 SoC प्रोसेसर दिला आहे. हा फोन अँड्रॉयड १० वर बेस्ड Funtouch OS 11 वर काम करतो.

वाचाः

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये दोन रियर कॅमेरे दिले आहेत. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक २ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनमध्ये स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये वायफाय, ब्लूटूथ 5.0 आणि 3.5 mm हेडफोन जॅक यासारखे फीचर मिळते. या फोनची किंमत १० हजार रुपयांच्या जवळपास असू शकते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here