या अॅपच्या वापरामुळे वेळेच्या एका मर्यादेपर्यंतच तुम्हाला फोन वापरता येणार आहे. त्यामुळे युजर्सना कुटुंबीयांनाही वेळ देता येणार आहे. गुगलने प्रायोगिक तत्वावर हे तीन अॅप लाँच केले आहेत. ‘अॅण्ड्राइड पोलीस’ने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या अॅपचे नाव Envelope आहे. सध्या हे अॅप गुगल पिक्सल ३एस वर काम करत आहे. या अॅपच्या मदतीने युजर्सला एका खास पीडीएफची प्रिंटआउट काढावी लागेल. या प्रिंटआउटची घडी करून त्याला डिव्हाइसमध्ये ठेवावे लागेल. यामुळे युजर्सचा फक्त फोन डायलर आणि कॅमेरा सुरू राहील.
असे काम करते अॅप
Activity Bubbles आणि Screen Stopwatch आहेत. हे दोन्ही अॅप अॅण्ड्राइड स्मार्टफोनवर डाउनलोड करता येऊ शकतात. हे दोन्ही अॅप एका खासप्रकारचे लाइव्ह वॉलपेपर आहेत. किती वेळ स्मार्टफोनचा वापर करण्यात आला हे युजर्सला यावर कळणार आहे. अॅक्टिव्ही बबल्स अॅप जितक्या वेळेस स्मार्टफोन अनलॉक करू तितके बबल्स (फुगे) तयार करणार. दिवसअखेर कितीवेळेस तुम्ही स्मार्टफोन अनलॉक केला हे समजणार आहे.
गुगलने डेव्हलप केले आहेत अॅप
हे दोन्ही अॅप गुगलच्या क्रिएटीव्ह लॅबने डेव्हलप केले आहेत. प्रायोगिक तत्वावर अॅप टेस्ट करणारा हा गुगलचा विभाग आहे. या अॅपमध्ये युजर्सने किती वेळ मोबाइलचा वापर केला, हे समजणार आहे. त्यावरून युजर्सला मोबाइल वापर ठरवावा लागणार आहे. सध्या हे अॅप प्रायोगिक तत्वावर असून आगामी काळात आणखी काही अॅप लाँच होणार आहेत.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times