नवी दिल्लीः जगातील सर्वात प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी सॅमसंग (Samsung) ने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर सुरू केली आहे. ग्राहकांसाठी कंपनीने सुरू केले आहे. या ठिकाणी कंपनीचे महागडे फोन कमी किंमतीत भाड्याने घेवून जावू शकता येते. म्हणजेच सॅमसंगचे महागडे मोबाइल्स खरेदी करण्यात जे लोक सक्षम नाहीत ते लोक या कार्यक्रमांतर्गत फोन भाड्याने घेवू शकतात.

वाचाः

एका महिन्यापासून एका वर्षापर्यंत
Samsung Flagship Mobiles Rental Programme च्या अंतर्गत लोक सीरीजचे जबरदस्त फोन्स एक महिना, ३ महिने, ६ महिने आणि १२ महिन्यासाठी रेंट म्हणजेच भाड्याने घेवून जावू शकतात. त्याचा वापर करू शकतात. यासाठी त्यांना दर महिन्याला एक निश्चित रक्कम द्यावी लागणार आहे. ग्राहक सॅमसंग स्टोरवर जावून आपला मनपसंत सॅमसंग गॅलेक्सी फोन निवडू शकतात. तसचे मंथली रेट देवू शकतात. ही सुविधा केवळ जर्मनीत सुरू करण्यात आली आहे. लोक Grover कंपनी द्वारे सॅमसंग जबरदस्त फोन भाड्याने घेवून जावू शकतात.

वाचाः

सॅमसंगच्या या फोनचे भाडे
Mobiles Rental Programme मध्ये सॅमसंगचा जबरदस्त फोन Samsung Galaxy S20 FE च्या १२८ जीबी स्टोरेजच्या फोनसाठी एका महिन्यासाठी ५९.९० यूरो, तीन महिन्यासाठी ४९.९०, सहा महिन्यासाठी ३९.९० युरो मंथली आणि एका वर्षासाठी प्रत्येक महिन्याला २९ .२० युरो देवून रेंटवर फोन घेता येवू शकतो. एक युरो ८९.३१ रुपयांचा असतो. म्हणजेच एका वर्षासाठी फोन घेतल्यास फोन स्वस्त पडतो. त्याच प्रमाणे Samsung Galaxy S20 फोनसाठी एका महिन्यासाठी घ्यायचा असेल तर तुम्हाला ९९.९० युरो द्यावे लागतील. तर तीन महिन्यासाठी ६९.९० युरो मंथली, ६ महिन्यासाठी ५९.९० युरो मंथली आणि एक वर्षासाठी प्रत्येक महिन्याला ४९.९० युरो द्यावे लागतील.

वाचाः

इतक्या किंमतीत घेवून जा
Samsung Mobiles Rental Programme मध्ये कंपनीची बेस्ट फ्लॅगशिप मोबाइल Samsung Galaxy S20 Ultra एक महिन्यासाठी ११९.९० युरो देवून भाड्याने घेता येतो. जर तुम्हाला हा फोन ३ महिन्यासाठी हवा असेल तर प्रत्येक महिन्याला ९९.९० रुपये द्यावे लागतील. तसेच ६ महिन्यासाठी ७९.९० युरो मंथली आणि एका वर्षासाठी प्रत्येक महिन्याला ६९.९० रुपये द्यावे लागतील. जर्मनीत सुरू झालेली ही सेवा भारतासह अन्य देशात सुद्धा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here