नवी दिल्लीः सॅमसंग वेगाने आपल्या स्मार्टफोनची रेंज वाढवत आहे. या यादीत आता आपल्या प्रसिद्ध मध्ये नवीन डिव्हाईस ची एन्ट्री करण्याची तयारी करीत आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनला BIS (ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स) ने सर्टिफाय केले आहे. या दरम्यान, बेंमार्किंग वेबसाइट गीकबेंच वर एक स्मार्टफोन लिस्ट करण्यात आला आहे. ज्याला Galaxy M12 असल्याचे सांगितले जात आहे.

वाचाः

गॅलेक्सी M11 चा सक्सेसर असू शकतो
गीकबेंच लिस्टिंग नुसार सॅमसंगचा हा पहिला स्मार्टफोन प्रोसेसर सोबत येवू शकतो. हे तेच प्रोसेसर आहे. ज्याला कंपनीने पहिल्यांदा गॅलेक्सी A21s मध्ये इंट्रोड्यूस केले होते. गॅलेक्सी M12 एक एन्ट्री लेवल स्मार्टफोन असू शकतो. असे सांगितले जात आहे की, गॅलेक्सी M11 चा सक्सेसर म्हणून लाँच केले जावू शकते.

वाचाः

मिळू शकतात हे खास वैशिष्ट्ये
सॅमसंग गॅलेक्सी एम १२ अँड्रॉयड ११ ओएस आणि ३ जीबी रॅम सोबत येवू शकतो. या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून Exynos 850 SoC चिपसेट ऑफर केले जावू शकते. या महिन्याच्या सुरुवातीला SM-M127F च्या नावाने ब्लूटूथ SIG आणि वायफाय अलायन्स वेबसाइट वर एक डिव्हाईसला स्पॉट केले होते. या डिव्हाइसमध्ये गॅलेक्सी एम १२ सांगितले जात आहे. लिस्टिंगच्या माहितीनुसार, या फोनमध्ये ब्लूटूथ व्हर्जन ५.० सोबत सिंगल बँड वाय फाय मिळू शकतो.

वाचाः

फोनच्या सुरुवाती रेंडर्स अनुसार साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सोबत स्क्वेयर शेप कॅमेरा मॉड्यूल मिळणार आहे. ज्यात अनेक सेन्सर असतील. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये तुम्हाला यूएसबी टाइप सी आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक यासारखे फीचर्स दिले जातील. फोनच्या डिस्प्लेत वॉटरड्रॉप नॉच डिझाइन सोबत ६.७ इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. कंपनी या फोनमध्ये 7000mAh ची बॅटरी देवू शकते, अशी अफवा आहे. या फोनला २०२१ मध्ये सुरुवातीला लाँच केले जावू शकते.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here