वाचाः
बजेट स्मार्टफोन सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालणार
रेडमी ९ पॉवरच्या लीक किमतीची खरी माहिती १७ डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. परंतु, रेडमी पुन्हा एकदा बजेट स्मार्टफोन सेगमेंट मध्ये धमाल उडवण्यासाठी तयार आहे. रेडमीच्या या फोनसंबंधी काय खास असणार आहे जाणून घ्या.
वाचाः
Redmi Note 9 4G चे इंडियन व्हर्जन
गेल्या काही दिवसांत चीनमध्ये Redmi Note 9 5G सोबत Redmi Note 9 4G लाँज केले होते. भारतात आता रेडमी ९ पॉवर च्या रुपात लाँच केला जात आहे. भारतात रेडमी ९ सीरीज च्या Redmi 9 Prime, Redmi 9 आणि Redmi 9A यासारख्या फोनची विक्री आधीपासूनच सुरू आहे.
वाचाः
फोनचे खास वैशिष्ट्ये
Redmi 9 Power या स्मार्टफोनमध्ये कंपनी पॉवरफुल Qualcomm Snapdragon 662 SoC प्रोसेसर सोबत लाँच करू शकते. रेडमी 9 पॉवरला 4GB RAM + 64 GB सोबत 6GB RAM + 128 GB स्टोरेज मध्ये लाँच करू शकते. या जबरदस्त बजेट फोनमध्ये खास वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा मेन प्रायमरी कॅमेरा सोबत ४ रियर कॅमेरा सेटअप दिला आहेच ज्यात ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. तसेच ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.
वाचाः
बॅटरी पॉवरफुल
Redmi 9 Power मध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये मोठी 6,000mAh क्षमतेची बॅटरी दिली जाणार आहे. १८ वॉटचा फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत फोन लाँच करण्यात येणार आहे. या फोनला येत्या १७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता अॅमेझॉनवर लाँच करण्यात येणार आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times