नवी दिल्लीः Vi (Vodafone Idea) ने आपल्या पोर्टफोलियोत नवीन पोस्टपेड फॅमिली प्लान जोडला आहे. ज्यात ९४८ रुपयांच्या किंमतीत तुम्हाला अनलिमिटेड डेटा व व्हाइस कॉलिंगचा फायदा प्रायमरी युजर्संना मिळणार आहे. नवीन व्हीआय पोस्टपेड फॅमिली प्लान ९४८ रुपयांत दोन कनेक्शनसाठी उपलब्ध आहे. परंतु, युजर्स या पॅकमध्ये ५ सदस्यांना जोडू शकतो. ज्यात त्यांना प्रति नवीन कनेक्शनसाठी २४९ रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. हा ९४८ रुपयांचा नवीन प्लान ६९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानचा मोडीफाईड व्हर्जन आहे. ज्याला कंपनीने जुलै महिन्यात लाँच केले होते.

वाचाः

सध्या हा प्लान Vi च्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला नाही. परंतु, OnlyTech च्या माहितीनुसार, त्याच्या अधिकृत वेबसाइटवर काही डॉक्यूमेंट्स मिळाले आहेत. ज्यात हे ९४८ रुपयांचा पोस्टपेड फॅमिली प्लान सध्या उत्तर प्रदेश सर्कलमध्ये ३ डिसेंबर २०२० पासून उपलब्ध आहे. या प्लान अंतर्गत प्रायमरी कनेक्शनला अनलिमिटेड हाय स्पीड डेटा प्राप्त आहे. तर सेकंडरी कनेक्शनला ३० जीबी पर्यंत डेटा मिळतो. तसेच सेकंडरी कनेक्शनसाठी ३० जीबी पर्यंत डेटा रोलओव्हर सुविधा दिली जात आहे.
व्हाइस कॉल बेनिफिट्समध्ये ९४८ रुपयांच्या पोस्टपेड फॅमिली प्लानमध्ये अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्सचा समावेश आहे. तसेच यात प्रायमरी आणि सेकंडरी कनेक्शनला प्रति महिना १०० ची सुविधा मिळणार आहे.

वाचाः

Viच्या म्हणण्यानुसार, कंपनीची कमर्शियल युसेज पॉलिसी नुसार, अनलिमिटेड डेटा आणि व्हाइस लाभ पोस्टपेड प्लान्सची बिल सायकलच्या आत कोणत्याही व्यक्तीला १५० जीबी हून अधिक डेटा आणि ५० मिनिटे पेक्षा कमी व्हाइस कॉलिंग (इनकमिंग कॉल मिळून) ला कमर्शियल मानले जाईल. याचाच अर्थ तुम्हाला अनलिमिटेड लाभ मिळणार असे दिसत असले तरी तुम्हाला अनलिमिटेड ऑफर नसून मर्यादीत असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात सर्वच टेलिकॉम कंपन्यांकडून असे केले जात आहे.

वाचाः

९४८ रुपयांचा पोस्टपेड फॅमिली प्लान प्रायमरी आणि सेकंडरी कनेक्शनसाठी वार्षिक Vi Movies और TV अॅक्सेस फ्रीमध्ये देण्यात येतो. याशिवाय प्रायमरी कनेक्शनच्या युजर्सला वार्षिक बेसिकवर विना कोणत्याही शुल्कविना Amazon Prime Video आणि Zee5 Premium चे अॅक्सेस मिळते. तसेच ९४८ रुपयांच्या पोस्टपेड फॅमिली प्लानमध्ये २४९ रुपये प्रति युजर देवून ५ सदस्यांपर्यंत जोडता येवू शकते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here