नवी दिल्लीः आज गुगलच्या सेवेला फटका बसला आहे. जगभरातील गुगलची सेवा बाधित झाल्याचे दिसले आहे. सायंकाळी ५.२० वाजता गुगलची जीमेल सेवा आणि हँगआउट सह अनेक सेवामध्ये एरर () पेज पाहायला मिळाले. यूट्यूबवर सुद्धा ही समस्या उद्भवली आहे. तसेच गुगल सर्च इंजिन म्हणजेच google.com मात्र व्यवस्थित सुरू असल्याचे दिसत आहे. गुगलच्या या सेवेला कशामुळे फटका बसला याचे कारण, अद्याप समोर आले नाही. परंतु, युजर्संना खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे.

वाचाः

वाचाः

#YouTubeDOWN आणि #googledown ट्विटर ट्रेंड
सध्या गुगलची सेवा बाधित झाली आहे. त्यामुळे अवघ्या काही सेकंदात ट्विटरवर #YouTubeDOWN आणि #googledown ट्रेंड सुरू झाला आहे. अनेक जणांनी आपल्या जीमेलच्या एरर पेजचा स्क्रीन शॉट टाकायला सुरू केला आहे. यूट्यूब प्रमाणेच हँगआउट डाउन झाल्याने अनेकांनी आपली अडचणी सोशल मीडियावर मांडली आहे.

वाचाः

वाचाः

विना लॉगिन सुरू होतेय यूट्यूब
जर तुम्ही यूट्यूब उघडण्याचा प्रयत्न केला तर यूट्यूब उघडणार नाही. परंतु, जर विना लॉगिन यू्ट्यूब उघडला तर यूट्यूब चांगले काम करीत आहे. त्यामुळे असा संशय व्यक्त केला जात आहे की, गुगल लॉगिन सिस्टम काम करीत नाही. ट्विटर वर याला काही लोकांनी शेयर केले आहे.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here