स्मार्टफोन बाजारात १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचे खूप सारे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. भारत हा देश स्मार्टफोन मार्केटसाठी ओळखला जातो. त्यामुळे वेगवेगळ्या देशातील स्मार्टफोन मेकर कंपन्या भारतात आपला स्मार्टफोन लाँच करीत असतात. बजेट सेगमेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या किंमतीत अनेक फोन कंपन्यांनी आपले फोन २०२० मध्ये लाँच केलेले आहेत. १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत दमदार फीचर्स असलेले स्मार्टफोन मिळतात. या रेंजमध्ये लाँच झालेल्या फोन्सचा जबरदस्त लूक सोबत येतो. तसेच यासाठी खूप जास्त पैसे सुद्धा मोजावे लागत नाही. जर तुम्ही जबरदस्त स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला एकापेक्षा एक चांगले पर्याय सुचवत आहोत. २०२० मध्ये १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच झालेले जबरदस्त स्मार्टफोनसंबंधी ही खास माहिती….

BYE BYE 2020: या वर्षात १० हजारांपेक्षा कमी किंमतीतील या स्मार्टफोन्सचा बोलबाला

स्मार्टफोन बाजारात १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचे खूप सारे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. भारत हा देश स्मार्टफोन मार्केटसाठी ओळखला जातो. त्यामुळे वेगवेगळ्या देशातील स्मार्टफोन मेकर कंपन्या भारतात आपला स्मार्टफोन लाँच करीत असतात. बजेट सेगमेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या किंमतीत अनेक फोन कंपन्यांनी आपले फोन २०२० मध्ये लाँच केलेले आहेत. १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत दमदार फीचर्स असलेले स्मार्टफोन मिळतात. या रेंजमध्ये लाँच झालेल्या फोन्सचा जबरदस्त लूक सोबत येतो. तसेच यासाठी खूप जास्त पैसे सुद्धा मोजावे लागत नाही. जर तुम्ही जबरदस्त स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला एकापेक्षा एक चांगले पर्याय सुचवत आहोत. २०२० मध्ये १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच झालेले जबरदस्त स्मार्टफोनसंबंधी ही खास माहिती….

​Redmi 9 Prime: ९९९९ रुपयांपासून सुरू
​Redmi 9 Prime: ९९९९ रुपयांपासून सुरू

चीनची कंपनी शाओमीची सब ब्रँड कंपनी रेडमीचा हा फोन खरेदी करायचा असेल तर यासाठी तुम्हाला १० हजारांपेक्षा कमी किंमत मोजावी लागते. १० हजारांपेक्षा कमी किंमतीत क्वॉड कॅमेरा सेटअप, ६.५३ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ८० प्रोसेसर, ४ जीबी रॅम देण्यात आला आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 5020mAh ची बॅटरी दिली आहे. फास्ट चार्जिंग सपोर्ट सुद्धा या फोनमध्ये मिळतो. फोनमध्ये ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ते वाढवता येवू शकते. या फोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे.

​Realme Narzo 20A: ९ हजार ४९९ रुपये
​Realme Narzo 20A: ९ हजार ४९९ रुपये

रियलमी नार्जो २० ए मध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसर, ३ जीबी रॅम प्लस १२ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तसेच ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे. रियलमीच्या या फोनध्ये ४जी एलटीई, वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ ५.० आणि मायक्रो यूसबी पोर्ट यासारखे ऑप्शन दिले आहेत. या फोनची किंमत ९ हजार ४९९ रुपये आहे.

​Vivo U10: ९ हजार ९९० रुपयांपासून सुरू
​Vivo U10: ९ हजार ९९० रुपयांपासून सुरू

विवो कंपनीचा Vivo U10 या स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज दिला आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. हँडसेटमध्ये ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज दिला असून फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसर दिला आहे. या फोनची किंमत ९ हजार ९९० रुपये आहे.

​Nokia C3:८ हजार ९९९ रुपये
​Nokia C3:८ हजार ९९९ रुपये

नोकिया सी ३ या स्मार्टफोनला भारतात नुकतेच लाँच केलेले आहे. या फोनला २ जीबी रॅम प्लस आणि १६ जीबी स्टोरेज तसेच ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज या व्हेरियंटमध्ये लाँच केलेले आहे. या फोनची किंमत अनुक्रमे ७ हजार ४९९ रुपये तसेच ८ हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ५.९९ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोन अँड्रॉयड १० ओएस वर काम करतो. या फोनमध्ये ऑक्टा कोर यूनिसॉक SC9863A प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सिंगल रियर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

​Infinix Smart 4 Plus: ७ हजार ९९९ रुपये
​Infinix Smart 4 Plus: ७ हजार ९९९ रुपये

इनफिनिक्स स्मार्ट ४ प्लस मध्ये ३ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोरेज दिला आहे. या फोनची किंमत ७ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. फोन अँड्रॉयड बेस्ड XOS 6.2 वर काम करतो. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. फोनमध्ये ६.८२ इंचाचा एचडी प्लस ड्रॉप नॉच डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेशियो 20.5:9 आहे. या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हँडसेट ग्रीन, पर्पल आणि ग्रे कलरमध्ये उपलब्ध करून दिला आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here