२०२० हे वर्ष संपायला आता अवघे काही दिवस उरले आहे. वर्ष संपण्यासाठी काउंटडाउन सुरू झाले आहे. २०२० वर्षात अनेक सेक्टर, कंपन्यांना फटका बसला असला तरी स्मार्टफोन इंडस्ट्रीजला मात्र हे वर्ष बऱ्यापैकी राहिले आहे. या वर्षी जगभरातील मोबाइल कंपन्यांनी आपले अनेक नवीन स्मार्टफोन्स भारतीय मार्केटमध्ये उतरवले आहेत. या वर्षी मिड रेंज स्मार्टफोन सेगमेंट ( १० ते १५ हजार रुपये) अनेकांची पसंती असल्याचे दिसून आले आहे. या सेगमेंटमध्ये कमी किंमतीत काही प्रीमियम फीचर्स डिव्हाईस मिळाले आहेत. जाणून घ्या या अशाच सेगमेंट मधील टॉप ४ स्मार्टफोन विषयी. जे वर्षभर खूप चर्चेत राहिले आहेत.

BYE BYE 2020: या वर्षातील दमदार फीचरचे 'टॉप ४' स्मार्टफोन

२०२० हे वर्ष संपायला आता अवघे काही दिवस उरले आहे. वर्ष संपण्यासाठी काउंटडाउन सुरू झाले आहे. २०२० वर्षात अनेक सेक्टर, कंपन्यांना फटका बसला असला तरी स्मार्टफोन इंडस्ट्रीजला मात्र हे वर्ष बऱ्यापैकी राहिले आहे. या वर्षी जगभरातील मोबाइल कंपन्यांनी आपले अनेक नवीन स्मार्टफोन्स भारतीय मार्केटमध्ये उतरवले आहेत. या वर्षी मिड रेंज स्मार्टफोन सेगमेंट ( १० ते १५ हजार रुपये) अनेकांची पसंती असल्याचे दिसून आले आहे. या सेगमेंटमध्ये कमी किंमतीत काही प्रीमियम फीचर्स डिव्हाईस मिळाले आहेत. जाणून घ्या या अशाच सेगमेंट मधील टॉप ४ स्मार्टफोन विषयी. जे वर्षभर खूप चर्चेत राहिले आहेत.

​रियलमी नार्जो 20 प्रो
​रियलमी नार्जो 20 प्रो

६ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनची किंमत फ्लिपकार्टवर १४ हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ९५ चिपसेट दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा दिला आहे. सेल्फी साठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500mAh ची बॅटरी दिली आहे. जी ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.

​मोटोरोला G9 पॉवर
​मोटोरोला G9 पॉवर

मोटोरोलाचा हा लेटेस्ट स्मार्टफोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये ६.७८ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. या फोनला पॉवर देण्यासाठी फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६६३ प्रोसेसर दिले आहे. फोनला २० वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. फोटोग्राफीसाठीयात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

​शाओमी रेडमी नोट 9
​शाओमी रेडमी नोट 9

४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनची किंमत १३ हजार ८० रुपये आहे. या फोनमध्ये ६.५३ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा दिला आहे. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ८५ चिपसेट देण्यात आला आहे. या फोनला पॉवर देण्यासाठी यात 5,020mAh ची बॅटरी दिली आहे. स्वस्तात मस्त फोन हवा असल्यास हा एक चांगला ऑप्शन होवू शकतो.

​सॅमसंग गॅलेक्सी M21
​सॅमसंग गॅलेक्सी M21

दक्षिण कोरियाची स्मार्टफोन मेकर कंपनी सॅमसंगचा M21 या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबीचा इंटरनल स्टोरेज या फोनमध्ये देण्यात आला आहे. फोनमध्ये 1080×2340 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत६.४ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. Exynos 9611 SoC प्रोसेसर सोबत या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत एक ८ मेगापिक्सलचा आणि एक ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा पंचहोल कॅमेरा दिला आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here