नवी दिल्लीः ओप्पो लवकरच भारतात आपला नवीन स्मार्टफोन लाँच करू शकते. नुकतीच ओप्पोच्या या सीरीजमधील डिव्हाईसची वैशिष्ट्ये आणि खास डिझाईनची माहिती उघड झाली होती. आता Oppo A15s ची किंमत सुद्धा एका नवीन लीकमधून उघड झाली आहे. लाँच आधीच Oppo A15s या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये आणि किंमत उघड झाली आहे. जाणून घ्या या फोनसंबंधी.

वाचाः

च्या एका रिपोर्टनुसार, Oppo A15s ला देशात ११ हजार ४९० रुपयांत लाँच करण्यात येणार आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ही असणार आहे. ओप्पो ए १५ एस वरून अनेक बातम्या आल्या होत्या की, हा फोन ऑक्टोबर मध्ये लाँच करण्यात आलेल्या ओप्पो ए १५ चे अपग्रेडेड व्हेरियंट असणार आहे. ओप्पो ए १५ ला भारतात १० हजार ९९० रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते.

वाचाः

एका प्रमोशनल लीक पोस्टर नुसार, ओप्पो ए १५ एस सिल्वर कलर मध्ये येणार आहे. डिव्हाइस मध्ये उजव्या बाजुला व्हॅल्यूम आणि पॉवर बटन दिले जाणार आहे. तर डाव्या बाजुला एक सिम स्लॉट असणार आहे. या फोनच्या वैशिष्ट्यावर एक नजर टाकल्यास Oppo A15s च्या या स्मार्टफोनमध्ये ६.५२ इंचाचा एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला जाणार आहे. डिस्प्लेचे रिझॉल्यूशन 720 x 1600 पिक्सल असणार आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला जाणार आहे. हँडसेटमध्ये रियरवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाणार आहे.

वाचाः

पोस्टरमध्ये ओप्पोच्या या फोनमध्ये कोणताही प्रोसेसर असणार यासंबंधी कोणतीही माहिती दिली गेली नाही. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी ३५ प्रोसेसर दिला जावू शकतो. बातम्यांच्या माहितीनुसार, हँडसेटमध्ये फोनला पॉवर देण्यासाठी यात 4230mAh बॅटरी दिली जावू शकते. या फोनमध्ये स्क्वायर शेप एआय ट्रिपल कॅमेरा सिस्टम दिला जाणार आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळू शकतो. फोनमध्ये पुढच्या बाजुला वॉटरड्रॉप नॉच मध्ये ५ मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर दिला जाणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here