नवी दिल्लीः रिलायन्स जिओने टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) ला पत्र पाठवले आहे. वोडाफोन – आयडिया आणि एअरटेल यांची तक्रार केली आहे. रिलायन्स जिओने आरोप केला आहे की, वोडाफोन आयडिया आणि एअरटेल पंजाबच्या शेतकरी आंदोलना आडून जिओ संदर्भात खोटी माहिती देत आहेत. आंदोलनाचा गैरफायदा घेत आहेत. टेलिकॉम सचिव एस. के. गुप्ता यांना पाठवलेल्या पत्रात रिलायन्स जिओने म्हटले की, या दोन्ही कंपन्यांनी ट्रायच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.

वाचाः

वाचाः

वोडाफोन आयडिया आणि एअरटेल उत्तर भारतात विविध भागात ग्राहकांना आपल्या सेवेकडे आकर्षित करण्यासाठी हा रस्ता अवलंबत आहेत. शेतकरी आंदोलनाचा गैरफायदा घेत आहेत. जिओ विरोधात या कंपन्या खोटा प्रचार करीत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. २८ सप्टेंबर रोजी ट्रायला पाठवलेल्या या पत्रात या दोन कंपन्यांविषयी नाराजी व्यक्त केली होती. परंतु, यानंतरही या दोन्ही कंपन्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत, असे जिओने म्हटले आहे.

वाचाः

वाचाः

रिलायन्स जिओ ने आपल्या आरोपात म्हटले की, या दोन्ही प्रतिस्पर्धी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना, एजन्ट्ंसना आणि रिटेलर्स द्वारे रिलायन्स जिओ विरुद्ध नकारात्मक मोहिम चालवत आहेत. त्यामुळे जिओला नुकसान होत आहे. ग्राहकांना चुकीची माहिती सांगून त्यांना पोर्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू करीत असल्याची माहिती आहे, असेही जिओने आपल्या पत्रात म्हटले आहे. या सर्व प्रयत्नाचा जिओने विरोध केला आहे. या दोन्ही कंपन्या ग्राहकांना कशा पद्धतीने चुकीची माहिती देत आहेत यासंबंधीचे काही फोटो आणि व्हिडिओचे पुरावे रिलायन्स जिओ ट्रायला देणार आहे.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here