नवी दिल्लीः भारतात डेल कंपनीने आणखी एक जबरदस्त लॅपटॉप (9310) लाँच केला आहे. ज्यात ३२ जीबी रॅम दिला आहे. 11th Gen Intel Core प्रोसेसर असलेल्या या लॅपटॉपमध्ये जबरदस्त पॉवर दिला आहे. आजपर्यंत तुम्ही १२ जीबी रॅम आणि २४ जीबी रॅमच्या लॅपटॉपविषयी ऐकले असेल परंतु, आता ३२ जीबी रॅमचा लॅपटॉप लाँच करण्यात आल्याने मार्केटमध्ये खळबळ उडाली आहे. डेलचा हा लॅपटॉप कंपनीच्या सध्याच्या XPS 13 च्या लॅपटॉपचे अपग्रेडेड वेरियंट आहे.

वाचाः

किंमत किती
Dell XPS 13 ला i5 आणि i7 वेरियंट्स मध्ये लाँच करण्यात आले आहे. ज्यात आय५ प्रोसेसरचा व्हेरियंटची किंमत १ लाख ५० हजार ९९० रुपये आहे. या लॅपटॉपला तुम्ही डेल स्टोर किंवा अॅमेझॉनवरून खरेदी करू शकता. दरम्याने आय ७ व्हेरियंटच्या किंमतीची माहिती अद्याप समोर आली नाही. याची विक्री जानेवारी २०२१ पासून सुरू करण्यात येणार आहे.

वाचाः

कलर ऑप्शन
Dell XPS 13 (9310) ला Platinum Silver आणि Arctic white woven कलर ऑप्शन मध्ये लॉन्च करण्यात आले आहे. या लॅपटॉपच्या i7 11th Gen Intel Core processors वेरियंट मध्ये Intel Iris Xe ग्राफिक्स लावलेले आहे.

वाचाः

डिस्प्ले आणि जबरदस्त
बॅटरी
Dell XPS 13 च्या वैशिष्ट्यांवर एक नजर टाकल्यास यात 13 इंचाचा UHD+ डिस्प्ले दिला असून या लॅपटॉपची स्क्रीन रिजॉल्यूशन 3840×2400 पिक्सल आहे. या लॅपटॉपची स्क्रीन Gorilla Glass 6 आणि 4-sided InfinityEdge display दिली आहे. याची स्क्रीन जास्त स्लीम आणि जास्त मोठी आहे. या लॅपटॉपला टच स्क्रीन आणि नॉन स्क्रीन ऑप्शन मध्ये लाँच करण्यात आले आहे. याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार खरेदी करू शकता. या नवीन लॅपटॉपचे वजन केवळ १.१९ किलोग्रॅम आहे. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जमध्ये लॅपटॉप १० तासांपासून १९ तासांपर्यंत वापर करता येवू शकतो.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here