नवी दिल्लीः भारतात अनेक चायनीज अॅप्सवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. टिकटॉसह पबजीसारख्या गेम्सवर भारतात बंदी घालण्यात आल्याने चायनीज कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता दक्षिण कोरियाची स्मार्टफोन मेकर कंपनी सॅमसंगने चीनला जोरदार झटका दिला आहे. चीनमध्ये असलेली आपली सॅमसंगने भारतात हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचाः

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत डिस्प्ले फॅक्ट्रीला नोएडा प्रायव्हेट लिमिटेड साठी खास उपाय योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. आता दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग आपला मोबाइल आयटी डिस्प्ले फॅक्ट्री चीनवरून भारतात शिफ्ट करणार आहे. ही फॅक्ट्री नोएडात तयार करण्यात येणार आहे. कंपनी यासाठी ४८२५ कोटींची गुंतवणूक करणार आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, सॅमसंगचे भारतातील पहिले हायटेक प्रोजेक्ट आहे. हे चीनवरून भारतात शिफ्ट केले जात आहे. भारत जगातील तिसरा असा देश आहे. ज्या ठिकाणी अशाप्रकारची युनिट असणार आहे.

वाचाः

५०० जास्त लोकांना मिळणार रोजगाराची संधी
या मॅन्यूफॅक्चरिंग फॅक्टीत ५१० लोकांना रोजगार मिळणार आहे. सॅमसंग टीव्ही, मोबाइल फोन, टेबलेट, तसेच घडी साठी वापरले जाणारे ७० टक्के डिस्प्ले प्रोडक्टस या ठिकाणी बनवणार आहे. सध्या कंपनीचे दक्षिण कोरिया, व्हिएतनाम आणि चीनमध्ये युनिट आहे. सॅमसंगचे नोएडीत मॅन्यूफॅक्चरिंग युनिट आहे. याचे उद्घाटन २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. कंपनीने त्यावेळी या युनिटमध्ये ४९१५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे म्हटले होते.

वाचाः

कंपनीने नुकतीच भारतात इलेक्ट्रॉनिक मॅन्यूफॅक्चरिंग आणि एक्सपोर्ट हब बनवण्यासाठी नवीन उपाय योजनांवर विचार करीत आहे. सॅमसंग सोबत अॅपल ची पार्टनर कंपन्या फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉनला नुकतीच सरकारने प्रोडक्शन अंतर्गत लिंक्ड इनसेंटिव स्कीम अंतर्गत मंजुरी दिली होती.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here