वाचाः
दोन वर्षाच्यानंतर व्हॉट्सअॅप पेमेंट सेवेला नोव्हेंबर महिन्यात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून १६० बँकांसोबत यूपीआयवर लाइव जाण्याची परवानगी मिळाली होती. व्हॉट्सअॅपच्या या सुविधेमुळे लोकांना आता सोप्या पद्धतीने पैशांची देवाण-घेवाण करता येवू शकणार आहे. फेसबुक फ्यूल फॉर इंडिया वर्चुअल कार्यक्रमात व्हॉट्सअॅपचे प्रमुख (भारत) अभिजित बोस यांनी सांगितले की, लोकांना आता व्हॉट्सअॅपवरून कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना पैसे पाठवता येवू शकणार आहे. पैसे पाठवण्यासाठी कोणत्याही स्थानिक बँकेत जाण्याची गरज पडणार नाही. लोकांना घरी बसून पैसे पाठवता येवू शकतील.
वाचाः
व्हॉट्सअॅप वर पेमेंट्सची सुविधा गुगल पे, फोन पे, भीम अॅप आणि अन्य बँकेच्या अॅप्स सारखीच असणार आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप च्या वॉलेटमध्ये पैसे ठेवण्याची गरज नाही. कारण, आता तुम्ही WhatsApp द्वारे आपले बँक अकाउंट वरून थेट पेमेंट करू शकाल. ज्यावेळी पेमेंट्स साठी रजिस्टर कराल त्यावेळी तुम्हाला WhatsApp वर एक फ्रेश यूपीआय आयडी क्रिएट करावा लागणार आहे. त्यानंतर पेमेंट्स सेक्शनवर जावून या आयडीला पाहू शकता.
वाचाः
WhatsApp Payments चा वापर उपयोग करून तुम्ही पैसे पाठवू शकता. ज्यांच्याकडे यूपीआय आहे. जसे भीम, गुगल पे किंवा फोन पे यासारखे अन्य अॅप द्वारे करू शकाल. ज्यांना पैसे पाठवायची असेल त्यांच्याकडे व्हॉट्सअ्ॅप पेमेंट नसेल तरी त्यांना पैसे पाठवता येवू शकणार आहे. यूपीआयसाठी एक लाख रुपयांची देवाण घेवाण सीमा एक लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. यूपीआय एक फ्री सेवा आहे. याच्या देवाण घेवाणीवर कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times