नवी दिल्लीः रियलमी ८ सीरीजच्या लाँचसंबंधी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लीक रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, कंपनी या फोनला जानेवारी २०२१ मध्ये लाँच करणार आहे. रियलमी ८ सीरीजला कंपनी अपकमिंग नार्जो ३० सीरीज सोबत लाँच करू शकते. या दोन्ही सीरीजला कंपनी एकत्र लाँच करणार की नाही हे आताच काही स्पष्ट सांगता येणार नाही.

वाचाः

रियलमी ८ सीरीज अंतर्गत दोन स्मार्टफोन रियलमी ८ आणि रियलमी ८ प्रो लाँच होवू शकतो. हे दोन्ही डिव्हाइस रियलमी ७ आणि रियलमी ७ प्रो चे अपडेटेड म्हणून लाँच करण्यात येणार आहेत. या सीरीजच्या प्रो मॉडलमध्ये अनेक जबरदस्त फीचर देण्यात आले होते. कंपनी रियलमी ८ सीरीज च्या प्रो व्हेरियंटमध्ये रियलमी ७ प्रोच्या तुलनेत आणि अडवॉन्स्ड फीचर आणि खास वैशिष्ट्ये ऑफर करणार आहे.

वाचाः

रियलमी ७ प्रोचे खास वैशिष्ट्ये
या फोनमध्ये 2400×1080 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबीचे इंटरनल स्टोरेज देण्यात आलेल्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर दिला आहे. फोनची मेमरी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते.

वाचाः

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा आणि दोन २ मेगापिक्सलचे कॅमेरे दिले आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा फोन अँड्रॉयड १० वर बेस्ड Realme UI वर काम करतो. इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरच्या या फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी दिली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here