नवी दिल्लीः दिग्गज टेक कंपनी वनप्लस युजर्संसाठी धमाकेदार ” आणला आहे. या सेलमध्ये कंपनीने 8 आणि OnePlus 8T स्मार्टफोन्स सोबत अन्य दुसऱ्या प्रोडक्ट्सवर सुद्धा जबरदस्त ऑफर्स दिले जाणार आहे. कंपनीच्या अॅनिवर्सरी सेलमध्ये युजर्संना तात्काळ डिस्काउंट, नो कॉस्ट ईएमआय आणि कॅशबॅक यासारखे बेनिफिट ऑफर केले जात आहे. जाणून घ्या डिटेल्स.

वाचाः

वनप्लस 8T आणि वनप्लस 8 सीरीज वर मोठी सूट
सेलमध्ये एचडीएफसी बँक कार्डवरून फोन खरेदी केल्यास तात्काळ डिस्काउंट मिळणार आहे. यूजर या सेलमध्ये जर एचडीएफसी बँक कार्डवरून वनप्लस ८टी फोन खरेदी करीत असेल तर त्यांना २ हजार रुपयांचा तात्काळ डिस्काउंट मिळणार आहे. याच बँकेच्या कार्डवरून वनप्लस ८ फोन खरेदी केल्यास ग्राहकांना ३ हजार रुपयांचा तात्काळ डिस्काउंटचा फायदा मिळणार आहे. कंपनीने सांगितले की, १७ ते १८ डिसेंबर ला अॅमेझॉन व फ्लिपकार्टवर वनप्लसचे ऑडियो प्रोडक्ट्स १० टक्के सूट सोबत खरेदी करता येवू शकतो.

वाचाः

वनप्लस स्टोर अॅपवर सुद्धा बेस्ट डील
कंपनी वनप्लस स्टोर अॅप वरून स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या युजर्संना ५०० रुपयांचा डिस्काउंट व्हाउचर दिला जात आहे. या अॅपवरून वनप्लस पॉवर बँक खरेदी करणाऱ्या युजर्संना वनप्लस ऑडियो प्रोडक्ट्सवर १० टक्के सूट मिळणार आहे. १७ डिसेंबर रोजी वनप्लस एक्सपिरीयन्स स्टोरवर पोहोचणाऱ्या ग्राहकांना १० ग्राहकांना कंपनी ३ हजार रुपयांचा अॅक्सेसरीज कूपन देणार आहे. याच प्रमाणे ११ ते ३० नंबर दरम्यान ग्राहकांना २ हजार रुपये आणि ३१ ते ७० व्या नंबरच्या ग्राहकांना ५० रुपयांचा कॉम्प्लिमेंट्री अॅक्सेसरीज कूपन देणार आहे.

वाचाः

वनप्लस टीव्हीवर जबरदस्त ऑफर
७व्या अॅनिव्हर्सरी सेल मध्ये कंपनी OnePlus Y सीरीजच्या टीव्हीवर डिस्काउंट ऑफर करीत आहे. सेलमध्ये या सीरीजच्या ३२ इंच आणि ४३ इंचाच्या टीव्हीवर १ हजार रुपयांची सूट दिली जाणार आहे. तसेच एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड, क्रेडिट कार्ड ईएमआय आणि डेबिट कार्ड ईएमआय ट्रान्झॅक्सन वर ४ हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here