वाचाः
Samsung M51 हा स्मार्टफोन २४ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीऐवजी २२ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येवू शकतो. तसेच यावर १० हजार ६५० रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट सुद्धा दिला जात आहे. या फोनमध्ये 7,000mAh ची बॅटरी आणि 64 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड इनफिनिटी-O डिस्प्ले दिला आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वर Redmi Note 9 Pro चा 4GB + 64GB व्हेरियंट १३ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येवू शकतो. तसेच अॅमेझॉनद्वारा या फोनवर ११ हजार ७५० रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट दिला जात आहे.
वाचाः
अॅमेझॉनच्या ख्रिसमस सेल मध्ये OnePlus 8T ला ४२ हजार ९९९ रुपयांत लिस्ट करण्यात आले आहे. या फोन खरेदी वर ग्राहकांना HDFC बँकच्या क्रेडिट ईएमआय आणि डेबिट ईएमआय खरेदीवर २ हजार रुपयांचा तात्काळ डिस्काउंट मिळणार आहे. तसेच एचडीएफसी डेबिट कार्ड वर १ हजार रुपयांचा तात्काळ डिस्काउंट दिला जाणार आहे. या ऑफर्सशिवाय ग्राहकांना १० हजार ६५० रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंटचा फायदा मिळणार आहे.
वाचाः
OnePlus Nord च्या 8GB + 128GB वेरिएंट ची विक्री २७ हजार रुपयात केली जात आहे. ग्राहकांना HDFC बँक क्रेडिट कार्ड, क्रेडिट EMI आणि डेबिट EMI ट्रान्झॅक्शनवर १ हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जाणार आहे. तसेच १० हजार ६५० रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकतो. Redmi 9 Prime च्या 4GB + 64GB फोनची विक्री ९९९९ रुपयांत केली जात आहे.
वाचाः
लॅपटॉपमध्ये 15.6-इंचाचा HP Pavilion gaming (DK0268TX)लॅपटॉपची विक्री ६४ हजार ४९० रुपयात केली जात आहे. अॅमेझॉनच्या सेलमध्ये १५.६ इंचाचा 120Hz FHD डिस्प्ले चा Dell G3 3500 गेमिंग लॅपटॉप ७२ हजार ९९० रुपयात खरेदी करता येवू शकतो. 2-इन-1 HP Pavilion x360 लॅपटॉपला ७४ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येवू शकतो. या सर्व लॅपटॉपवर एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times