वाचाः
या सीरीज संबंधी म्हटले जात आहे की, कंपनी याला अमेरिका आणि साउथ कोरिया मध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेट सोबत लाँच करणार आहे. तर भारत आणि युरोपमध्ये याला Exynos प्रोसेसर सोबत आणणार आहे. गीकबेंज लिस्टिंगमध्ये या फोनला सिंगल कोर टेस्टमध्ये १००६ गुण मिळाले आहेत. तसेच मल्टी कोर टेस्टमध्ये ३०५९ गुण मिळाले आहेत.
वाचाः
सॅमसंग गॅलेक्सी एस२१ अल्ट्रा मध्ये मिळणार हे फीचर
फोनमध्ये 1440×3220 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.८ इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोनचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे यात न्यू जनरेशन इन स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.
वाचाः
फोनमध्ये मेटल ग्लास बॉडी दिली आहे. फोनची डिझाइन अल्ट्रा स्लिम बेजल दिले आहे. याचा डिस्प्ले पंच होल असणार आहे. IP68 रेटिंग च्या या फोनमध्ये रियर मध्ये पाच कॅमेरे मिळणार आहे. फोनच्या रियरमध्ये १०८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल शूटर, १० मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा, १० मेगापिक्सलचा एक पेरिस्कोप लेन्स आणि एक लेजर ऑटोफोकस युनिट दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ४० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.
वाचाः
१२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनच्या इंडियन व्हर्जनमध्ये Exynos 2100 चिपसेट मिळणार आहे. अँड्रॉयड ११ ओएस सोबत येणाऱ्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत ९० हजार रुपयांच्या जवळपास असू शकते.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times