वाचाः
रेडमी ९ पॉवरची किंमत
रेडमी ९ पॉवर ला ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेजमध्ये लाँच केले आहे. या फोनची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. तर ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. स्मार्टफोन ब्लेजिंग ब्लू, इलेक्ट्रिक ग्रीन, फेयरी रेड आणि मायटी ब्लॅक कलर मध्ये मिळणार आहे. हा फोन अॅमेझॉन व Mi.com वर ऑनलाइन मिळणार आहे. तसेच मी होम्स स्टूडियोज आणि मी स्टोर्सवर ऑफलाइन उपलब्ध होणार आहे. या फोनचा पहिला सेल २२ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे.
वाचाः
रेडमी ९ पॉवरची वैशिष्ट्ये
ड्यूल सिमच्या रेडमी ९ पॉवर अँड्रॉयड १० बेस्ड MIUI 12 वर चालतो. फोनमध्ये ६.५३ इंचाचा एचडी प्लस डॉट ड्रॉप स्क्रीन दिली आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आहे. प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास ३ दिला आहे. हँडटेसमध्ये ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर, अड्रेनो ६१० जीपीयून आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम तसे ६४ जीबी आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकतो.
वाचाः
रेडमी ९ पॉवर मध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. रेडमीच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. रेडमीच्या या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (AI) फेस अनलॉक सपोर्ट दिला आहे.
वाचाः
कनेक्टिविटी साठी रेडमी ९ पॉवर मध्ये ४ जी व्हीओएलटीई, ड्यूल बँड वाय फाय, ब्लूटूथ ५.०, यूएसबी टाईप सी आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक दिला आहे. या फोनला पॉवर देण्यासाठी 6000mAh बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times