नवी दिल्लीः आपल्याकडे असे अनेक जण असतात त्यांच्या आयुष्यात नंबरला खूप मोठे स्थान असते. अनेक जणांना तर फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर हवा असतो. त्यांच्यासाठी ते वाट्टेल तितकी किंमत मोजायलाही मागेपुढे पाहत नाहीत. परंतु, व्हीआयपी आणि फॅन्सी नंबर कसा मिळवायचा हे अनेकांना माहिती नसते. व्हीआयपी-फॅन्सी नंबरसाठी अर्ज केल्यास तुम्हाला तो मिळू शकतो. जाणून घ्या कसा मिळवता येवू शकतो व्हीआयपी-फॅन्सी मोबाइल नंबर.

वाचाः

असा करा अर्ज
फॅन्सी किंवा VIP नंबरसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात आधी गुगलवर जावून (उदारणासाठी) सर्च करा. यानंतर एक सर्वात वरच्या दिलेल्या वेबसाइटवरील CYMN वर क्लिक करा. याला ओपन केल्यानंतर एक विंडो समोर दिसेल. ज्यात वेगवेगळ्या झोन प्रमाणे स्टेट (राज्य) देण्यात आले आहेत. तुम्ही ज्या राज्यात राहत आहात त्याला सिलेक्ट करा. स्टेटवर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. यात दिलेल्या स्लाइडरला स्लाइड करून पेजला अनलॉक करू शकता.

वाचाः

पेजच्या अनलॉक केल्यानंतर काही नंबर तुमच्या समोर दिसतील. यातील दोन नंबर दिले आहेत. एक साधे नंबर आणि दुसरे व्हीआयपी नंबर. आता तुम्हाला व्हीआयपी-फॅन्सी नंबरवर क्लिक करावे लागेल. यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन टेबल दिसेल. यात एक Cost च्या नावाचा ऑप्शन दिला आहे. या नंबर्सला खरेदी करण्यासाठी तुम्हाला किंमत मोजावी लागेल. प्रत्येक नंबर्सच्या समोर किंमत लिहिलेली आहे. यातील तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिजिट नंबर सर्च करु शकता. यासाठी एक कंटेन्स मध्ये जावून सर्च करू शकता. याशिवाय, तुम्ही सर्च बाय सीरीजच्या ऑप्शन अंतर्गत नंबर सर्च करू शकता. आता जो नंबर तुम्हाला खरेदी करायचा आहे. तो सिलेक्ट करा.

वाचाः

वर दिलेल्या रिझर्व नंबर ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. तसेच त्यानंतर एक डॉयलॉग बॉक्स ओपन होईल. आता यात तुम्हाला अॅक्टिव मोबाइल नंबर एन्टर करावे लागेल. नंबर टाकताच तुम्हाला तुमच्या फोनवर एक पिन येईल. तो तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल. इतके केल्यानंतर तुम्हाला व्हीआयपी नंबर रिझर्व होईल. रिझर्व केल्यानंतर Fill Application वर क्लिक करावे लागेल. यात तुम्ही तुमची सविस्तर माहिती सबमिट करून ओके करा. यानंतर जवळच्या कंपनीच्या जवळच्या आउटलेटवर जावून फॉर्म भरू शकता. तसेच कंपनीच्या ऑफिसमध्ये जावून आपला रिझर्व नंबर आणि अल्टरनेट नंबर सांगून तुम्ही तुमचा आवडता व्हीआयपी-फॅन्सी नंबर मिळवू शकता.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here