नवी दिल्लीः युजर्संना सध्या बेस्ट कॅमेराचा स्मार्टफोन जास्त आवडत आहेत. त्यामुळे अनेक जण अशा फोनच्या शोधात असतात. कंपन्या सुद्धा युजर्संची मागणी लक्षात घेवून असे फोन बनवत असतात. जवळपास सर्वच कंपन्यांनी आपले ६४ मेगापिक्सल कॅमेऱ्याचे सेटअपचे स्मार्टफोन लाँच केले आहेत. ६४ कॅमेऱ्याच्या फोनसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागतात. परंतु, काही कंपन्यांनी स्वस्त किंमतीत बेस्ट कॅमेराचे फोन उपलब्ध केले आहेत. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी २०२० मधील टॉप ३ स्मार्टफोनची माहिती देणार आहोत. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला असून या फोनची किंमत २० हजारांपेक्षा कमी आहे.

वाचाः

६ जीबी रॅम प्लस ६४ जीबीचा इंटरनल स्टोरेजच्या या फोनची किंमत अॅमेझॉनवर १६ हजार ९९९ रुपये आहे. स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5,020mAh ची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले दिला आहे.

वाचाः

मोटोरोला वन फ्यूजन प्लस
मोटोरोलाच्या या फोनची किंमत १७ हजार ४९९ रुपये आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात ६४ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिला आहे. तसेच एक ८ मेगापिक्सलचा, एक ५ मेगापिक्सलचा आणि एक २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा पॉप अप कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७३० जी प्रोसेसर दिला आहे.

वाचाः

सॅमसंगच्या या फोनची किंमत १५ हजार ४९९ रुपये आहे. या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज या फओनमध्ये दिला आहे. ६.४ इंचाचा सुपर इनफिनिटी यू डिस्प्ले दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here