वृत्तसंस्था, नवी दिल्ली

देशामध्ये करोनाकाळात हा इंटरनेट माहिती-मनोरंजन मंच पाहण्यात यावर्षी जुलै महिन्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत ४५ टक्के वाढ झाल्याचे यूट्युबने शुक्रवारी सांगितले. या मंचावरील चित्रफीतींमध्ये प्रादेशिक चित्रफीतींना वाढती मागणी असल्याचे निरीक्षणही यूट्युबने नोंदवले आहे.

वाचाः

गेल्या काही वर्षांत स्मार्टफोन परवडणाऱ्या किंमतींत उपलब्ध होत गेल्यामुळे तसेच इंटरनेट जोडणीही आवाक्यात आल्यामुळे, इंटरनेटचा खर्च कमी झाल्यामुळे ऑनलाइन व्हीडिओ मजकूर पाहण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गेल्या काही वर्षांत वाढ झाली आहे. करोना संसर्गामुळे करावे लागलेले लॉकडाउन यामुळे ऑनलाइन व्हीडिओ पाहण्याचे प्रमाण अधिक झाले आहे.

वाचाः

गुगलच्या वरिष्ठ विपणन संचालक सपना चढ्ढा यांच्या मते, प्रत्येक तिघा भारतीयांपैकी एक ऑनलाइन व्हीडिओ पाहतो. यूट्युबवर त्याला एकाच वेळी विविध विषय हाताळायला मिळतात, ज्यामुळे यूट्युबला सर्वाधिक पसंती मिळत आहे. केवळ मनोरंजनासाठीच यूट्युब पाहिले जाते असे नव्हे, तर ज्ञानवर्धनासाठीही ते पाहिले जाते. त्यामुळे विविध कंपन्यांही आपले ब्रॅण्ड लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यूट्युबचा जाणीवपूर्वक वापर करू लागल्या आहेत, याकडेही चढ्ढा यांनी लक्ष वेधले आहे.

वाचाः

प्रादेशिक भाषा जोमात

यूट्युबने प्रसिद्ध केल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रादेशिक भाषांत अपलोड केल्या जाणाऱ्या चित्रफीती या यूट्युब पाहण्याचे प्रमाण वाढवणाऱ्या ठरल्या आहेत. प्रादेशिक भाषांतील मजकूर पाहण्यास ९३ टक्के लोक प्राधान्य देत आहेत. प्रादेशिक भाषांना मिळणारा प्रतिसाद पाहून यूट्युबने सहा प्रादेशिक भाषांत जाहिराती टाकण्यासही सुरुवात केली आहे.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here