वाचाः
BSNL या नवीन प्लानची माहिती सर्वात आधी Telecom Talk ने सार्वजनिक केली आहे. कंपनीच्या वेबसाइटवर भारत फायबर ब्रॉडबँड प्लानची महिन्याची किंमत ४९९ रुपये आहे. यात युजर्संना 50Mbps हाय स्पीड डेटा मिळणार आहे. याआधी युजर्संना १०० जीबी पर्यंत 20Mbps ची स्पीड मिळत होती. ३०० जीबी भारत फायबर ब्रॉडबँड प्लानची मासिक किंमत ७७९ रुपये आहे. ज्यात युजर्संना ३०० जीबी पर्यंत 100Mbps ची स्पीड मिळणार आहे.
वाचाः
आधी ही स्पीड 50Mbps मिळत होती. तसेच याशिवाय ३०० जीबी संपल्यानंतर याची इंटरनेट स्पीड कमी होऊन ती 2Mbps ऐवजी आता 5Mbps मिळणार आहे. तसेच युजर्संना या प्लानमध्ये Disney+ Hotstar Premium सब्सक्रिप्शन सुद्धा मिळणार आहे. बीएसएनएल ने 600GB CUL भारत फायबर प्लान मध्ये सु्द्धा संशोधन केले आहे. आता 50Mbps स्पीड ऐवजी 100Mbps पर्यंत स्पीड देणार आहे. तसेच ६०० जीबी संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 2Mbps ऐवजी 10Mbps करण्यात आली आहे. या प्लानसाठी महिन्याला ८४९ रुपये मोजावे लागतील.
वाचाः
500 जीबी भारत फायबर FTTH ब्रॉडबँड प्लान ला 50Mbps स्पीडच्या ऐवजी आता 100Mbps चे अपग्रेड केले आहे. 600 जीबी प्लान प्रमाणे 500 जीबी भारत फायबर प्लान मध्ये तुम्हाला 500 जीबी कोटा संपल्यानंतर 100Mbps ची स्पीड मिळणार आहे. या प्लानमध्ये सुद्धा डिज्नी प्लस हॉटस्टार प्रीमियम सब्सक्रिप्शनचे मिळणार आहे. या प्लानची किंमत ९४९ रुपये आहे.
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times