नवी दिल्लीः भारतात सर्वात जास्त स्मार्टफोन विकणारी चीनची कंपनी शाओमी २०२१ हे वर्ष सुद्धा गाजवणार आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच कंपनी भारतात आपली प्रसिद्ध Mi 10 सीरीजचा एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच करणार आहे. या फोनचे नाव आहे. हा फोन Redmi Note 9 Pro 5G चा रिब्रँडेड व्हर्जन असणार आहे. ५ जानेवारी रोजी लाँच करणाऱ्या या फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा असणार आहे.

वाचाः

Mi 10 सीरीजचा नवा फोन
रेडमीने आपला सर्वात स्वस्त ५ जी फोन Redmi Note 9 Pro 5G लाँच केला होता. यानंतर भारतात लवकर फोन लाँच केला जाईल असे बोलले जात होते. कंपनी ५ जी फोनला स्वस्त किंमतीत भारतात लाँच करू शकते. एआय सीरीजचा अपकमिंग फोन Mi 10i भारतात या सीरीजचे सध्याचे फोन Mi 10, Mi 10 Pro, Mi 10 Lite, Mi 10 Ultra आणि Mi 10 Lite Zoom Edition सोबत विक्री करणार आहे. गीकबेंच वेबसाइटवर Mi 10i ला मॉडल नंबर M2007J17I सोबत पाहिले गेले आहे.

वाचाः

फीचर्स आणि संभावित किंमत
Mi 10i ची संभावित फीचर्स मध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले असू शकतो. याचे स्क्रीन रिझॉल्यूशन 2400×1080 पिक्सल असणार आहे. एआयच्या या फोनमध्ये डिस्प्ले रिफ्रेश रेट 120Hz असणार आहे. 6GB RAM आणि 8GB RAM अशा दोन पर्यायात फोनला लाँच केले जावू शकते. या फोनमध्ये क्वॉलकॉम Snapdragon 750G SoC प्रोसेसर मिळू शकतो.

वाचाः

अँड्रॉयड १० वर बेस्ड फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप पाहायला मिळू शकतो. ज्यात प्रायमरी सेन्सर १०८ मेगापिक्सलचा असणार आहे. तसेच एमआय १० आय मध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. शाओमीच्या या अपकमिंग फोनमध्ये आणखी जबरदस्त फीचर्स मिळू शकतात. शाओमीच्या या फोनची भारतात किंमत ३० हजारांच्या जवळपास असू शकते.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here